पुणे जिल्ह्यातील बारामतीत तिहेरी तलाकचा पहिला ‘FIR’ दाखल

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – नुकताच तिहेरी तलाक कायदा अस्तित्वात आला असून या कायद्यांतर्गत पुणे जिल्ह्यातील पहिला गुन्हा बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मुस्लीम महिलांना विवाह वरील हक्काचे संरक्षण कायद्यानुासार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिहेरी तलाक प्रकरणातील हा जिल्ह्यातील पहिला गुन्हा आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील पीडित महिलेच्या वडीलांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादेवरून सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या शादाब इब्राहिम जमादार (रा. वुड अपार्टमेंट,कडनगर,बिल्डींग नंबर के १,प्लॅट नं ३०१ उंड्री, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्य़ादी यांच्या मुलीचे लग्न शादाब याच्यासोबत झाले आहे. तिची नांदण्याची इच्छा असताना देखील शादाबने मुलीला तलाक पाठवून चारित्र्यहनन असे अपशब्द वापरून तिची अब्रूवर आरोप केल्याचे फिर्य़ादी यांनी आपल्या फिर्य़ादेत म्हटले आहे. तिहेरी तलाक कायदा ३१ जुलै २०१९ रोजी अस्तित्वात आला. या पार्श्वभूमीवर बारामती पोलीस ठाण्यात दाखल झालेला राज्यातील पहिलाच गुन्हा असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भानुदास बंडगर करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –