Pune : जमीन मालकाकडे 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   जमीन व्यवहारातून जमीन मालकाकडे 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर त्या जमीन मालकाला जमीन खरेदी केल्यानंतर ठरल्यानुसार पैसे न देता पुन्हा पैसे मागितल्यास पिस्तुल दाखवत गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे.

याप्रकरणी गौतम जयंतीलाल सोळंकी, रणधीर जयंतीलाल सोळंकी (रा. शुक्रवार पेठ), दिलीप साहेबराव यादव, सुमित प्रकाश साप्ते व सागर दत्तात्रय मुजुमले यांना अटक केली आहे. याबाबत राजाराम बबन गोगावले (वय 44, रा. ससेवडी, भोर) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व फिर्यादी यांच्यात 2016 फिर्यादी यांच्या भोर तालुक्यातील ससेवाडी येथील जमिनीचा व्यवहार ठरला होता. त्यासाठी बुधवार पेठेतील सोळंकी ज्वेलर्स आणि वेळू फाटा येथे मीटिंग झाल्या होत्या. या व्यवहारापोटी फिर्यादीला एकूण 93 लाख रुपये देणे अपेक्षित होते. दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीचे खरेदीखत केले. त्यांनतर आरोपींनी फिर्यादीला 32 लाख 50 हजार रुपये चेकद्वारे दिले. मात्र, त्यांनतर फिर्यदिने उर्वरीत पैसे मागितले असता, आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच, पुन्हा पैसे मागण्यासाठी आला, तर गोळ्या घालण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच, पैसे पाहिजे असतील, तर 20 लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे (युनिट १) वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे.