पुणे : गुन्हे शाखेकडून पाच हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन
खासगी वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसमधून गुजरात राज्यातून आणलेला भेसळयुक्त खवा गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने जप्त केला आहे. पथकाने दोघांवर कारवाई करुन ४ हजार ८५२ किलो भेसळयुक्त खवा जप्त केला. ही कारवाई आज (शनिवार) सकाळी दहाच्या सुमारास स्वारगेट येथील पोर्णिमा टॉवर जवळ करण्यात आली.
[amazon_link asins=’B00BSE5WQ4,B0085SLDKU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7888346-be4e-11e8-bba4-93fbffbc25a8′]
गणेशोत्सवानिमीत्त गुन्हे शाखेचे वाहनचोरी विरोधी पथक स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. पथकातील पोलीस कर्मचारी शंकर संपते यांना खासगी बसमधून गुजरात राज्यातून भेसळयुक्त खवा पुण्यात विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी स्वारगेट येथे सापळा रचला. त्यावेळी निता ट्रॅव्हल्स कंपनीची बस (जीजे ०१ डीवाय ००४५) पोर्णिमा टॉवर येथे आली असता गाडीची झडती घेण्यात आली. गाडीमध्ये प्रवाशांऐवजी भेसळयुक्त खव्याची पोती पोलिसांना आढळून आली. अन्न व औषध प्रशासनाने खव्याचे नमुने घेतले असून पोलिसांनी खवा जप्त केला आहे. याप्रकरणी वाहन चालक हिंमतसिंग गोपालसिंग राठोड (वय-४५ रा. अहमदाबाद, गुजरात) व इतर दोन इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी खव्यासह निता ट्रॅव्हल्स कंपनीची गाडी जप्त केली आहे.
गणेशोत्सवादरम्यान खाव्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. व्यापाऱ्यांच्या मागणीवरुन भेसयुक्त खवा पुणे शहर, नागपूर व हैद्राबाद या ठिकाणी विक्री करीता आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना बच्चू कडूंचं आव्हान

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -२ भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी सुनिल पवार, शंकर संपते, जितेंद्र तुपे, मोहन येलपले तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एस.पी. शिंदे, पी.टी. गुंजाळ आणि म्हस्के यांच्या पथकाने केली.

पंधरा दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने अशाच प्रकारची कारवाई केली होती. या कारवाईत गुजरात राज्यातून पुणे शहता विक्रीसाठी आणलेला साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त केला होता. ही कारवाई पद्मावतीनजीक करण्यात आली होती. खाव्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने परराज्यातून भेसळयुक्त खावा पुणे, नगापूर, हैद्रबाद या शहरात विक्रीसाठी पाठवण्यात येतो.