पुण्यातील पुरामध्ये आत्‍तापर्यंत 23 जणांचा मृत्यू, अद्याप 8 जण बेपत्‍ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर आणि परिसरामध्ये बुधवारी (दि.18) रात्री झालेल्या ढगफुटी सदृष पावसामुळे अनेक सोसायटीमध्ये पाणी घुसले. नऱ्हे येथील सोसायीटीच्या पार्किंगमध्ये साठलेले पाणी कमी करण्याच्या प्रयत्नात वाहून गेलेल्या मुकेश गाडीलोहार या युवकाचा आणि जांभूळवाडी येथील कारमधून वाहून गेलेल्या तिघांपैकी सुरज उर्फ बाबू वाडकर यांचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागला आहे. त्यामुळे शहर आणि जल्ह्यातील मृतांची संख्या 23 वर पोहचली असून अद्याप 8 जण बेपत्ता आहेत.

खेड शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी गेलेल्या दोन महिलांचा आणि खडवसला येथे अज्ञात युवकाचा मृतदेह शुक्रवारी सापडला आहे. गुरुवारपर्यंत 18 मृतदेह सापडले होते तर शुक्रवारी 5 मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा 23 वर पोहचला आहे. शुक्रवारी अग्निशमन दलाच्या जवानांनी राबवलेल्या शोध मोहिमेत मुकेश गाडीलोहार (वय-28 रा. साईपुरम, नऱ्हे) आणि सूरज उर्फ बाबू संदीप वाडकर (वय-20 रा. संतोषनगर, कात्रज) यांचे मृतदेह आढळून आले.

खेडशिवापूर येथे पतीसह वाहून गेलेल्या आरती श्याम सुर्यवंशी (वय-35 रा. खेडशिवापूर) आणि सुवर्णा रामचंद्र जाधव (वय-65) यांचा मृतदेह आढळून आला आहे. तर खडवासाला येथे आढळून आलेल्या मृतदेहांची अद्याप ओळख पटली नसून ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. तर बेपत्ता झालेल्या व्यक्तींची वेगळी माहिती प्रशासनाकडे उपलब्ध झाली असून खेड शिवापूर येथील दर्ग्याच्या ओढ्यातून सुर्य़वंशी कुटुंबातील तिघेजण वाहून गेले होते. त्यापैकी गौरी सुर्यवंशी (वय-14) याचा मृतदेह गुरुवारी आढलून आला. तर आरती सुर्य़वंशी हिचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला असून पती श्याम सुर्य़वंशी हे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेत असताना पत्नी सुवर्णा जाधव यांचा मृतदेह आढळून आला.

वानवडी येथील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळ असलेल्या ओढ्यानजीकच्या पाण्यात व्हिक्टर ऑगस्टीन सांगळे (वय-28 रा. विमाननगर) आणि सलीम शेख (वय-45 रा. कँप, पुणे) हे दोघे कारसह वाहून गेले. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. सांगळे सीएचा विद्यार्थी असून शेख हा हिजवडी आयटीपार्कमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला आहे.

बेपत्तान नागरीक –
जांभूळवाडी – साईनाथ उर्फ गणेश तुकाराम शिंदे, निखिल दिनेश चव्हाण
वानवडी – सलीम शेख, व्हिक्टर ऑगस्टीन सांगळे
सासवड – छकुली अनंता खोमणे, आणखी दोघे जण बेपत्ता असून त्यांची नावे समजू शकली नाहीत
खेड शिवापूर – श्याम सुर्य़वंशी

Visit : Policenama.com