Pune Food Poisoning Navguru Institute | भोर येथील नवगुरु इंस्टिट्यूटमधील 28 मुलांना विषबाधा; 6 जणींची तब्बेत खालवल्याने ससूनमध्ये दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Food Poisoning Navguru Institute | पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील खोपी (Khopi Bhor taluka) येथील फ्लोरा इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (Flora Institute of Technology) या संस्थेच्या परिसरात असलेल्या नवगुरु इन्स्टिट्यूटमधील तब्बल 28 मुलींना अन्नातून विषबाधा (Pune Food Poisoning Navguru Institute) झाली आहे. यातील बहुतांश मुली या परराज्यातील आहेत. या मुली नवगुरु इंस्टिट्यूटमध्ये सॉफ्टवेअर प्रोफेशनलचे प्रशिक्षण (Software Professional Training) घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विषबाधा झालेल्या 28 पैकी 22 मुलींवर भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात (Bhor Sub-District Hospital) उपचार सुरु आहेत. तर 6 मुलींची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) दखल करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विषबाधा झालेल्या सर्व मुली फ्लोरा कँपसमध्ये (Flora Campus) वास्तव्यास असून त्यांची जेवणाची स्वतंत्र व्यवस्था आहे. रविवारी (दि.26) रात्री जेवण केल्यानंतर सोमवारी (दि.27) सकाळी 4 ते 5 मुलींना पोटदुखीचा आणि उलट्या-जुलाबाचा त्रास सुरु झाला. मात्र त्याकडे त्यांनी गांभिर्याने पाहिले नाही. सोमवारी रात्रीपर्यंत अनेक मुलींना त्रास सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मंगळवारी (दि.28) उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भोरच्या ग्रामीण रुग्णालयात 22 मुली उपचारासाठी दाखल झाल्या. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Pune Food Poisoning Navguru Institute)

दरम्यान, सध्या विषबाधा झालेल्या सर्व मुलींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. तर प्रकृती खालावलेल्या मुलींना तातडीने पुण्यातील (Pune News) ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

 

Web Title :- Pune Food Poisoning Navguru Institute | Food poisoning navguru institute 28 student bhor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Phone Tapping Case | IPS रश्मी शुक्ला ! फोन टॅपिंग प्रकरणात ठाकरे सरकारला दिलासा, कोर्टाने थेट केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले ‘हे’ निर्देश

 

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! द गेमचेंजर्स संघाचा विजयाचा षटकार; वैंकिज् इलेव्हन संघाचा विजयाचा चौकार

 

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 2172 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 59 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी