वन विभागाच्या ‘भोंगळ’ कारभाराचा ‘पर्दाफाश’, ‘सिलबंद’ केलेलं कोळसा गोडाऊन पुन्हा ‘अ‍ॅक्टीव्ह’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – वन विभागाने गेल्या आठ महिन्यापूर्वी सील केलेल्या अवैध कोळसा खाणीचे सील तोडून पुन्हा हा व्यवसाय विना दिक्कतपणे चालू असून हा विषय वन खात्याच्या निदर्शनास आणले असतानाही केवळ चालढकल केली जात आहे, यावरुन नक्की या खात्याची अडचण काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

थेऊर येथे अनेक दिवसांपासून चालू असलेल्या अवैध कोळसा डेपोवर वनविभागाने धडक कारवाई करत गोडाऊन सील केले होते एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध साठा असूनही आजपर्यंत कारवाई झालेली नव्हती. कारवाई नंतर अनेक महिने सर्व ठीक चालू असताना गेल्या काही दिवसांपासून पुन्हा मागचा दरवाजाचे सील तोडून पुन्हा अवैधरित्या व्यवसाय चालू आहे.

या कारवाईत सुमारे सातशेहून अधिक पोते कोळसा अवैधरित्या साठवलेला होता या कारवाईत स्थानिक वन अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी सुध्दा सहभागी झाले होते. हवेली तालुक्यात अवैधरित्या कोळसा विक्री व कोसळा भट्ट्या चालू होत्या यावर प्रतिबंध बसेल असे वाटले परंतु थोड्याच कालावधीत पुन्हा या व्यावसायिकांनी आपले बस्तान बसवले आजही काही भागात कोळसा भट्ट्या चालू असल्याची चर्चा आहे. तसेच चोरुन कोळसा व्यापार चालू असल्याची माहिती समोर येत आहे.

या विषयी हवेलीचे वनपाल एम जे सणस यांना याची कल्पना पाच दिवसापूर्वी दिली होती, परंतु मी कर्मचारी पाठवून अहवाल मागवतो असे सांगितले. परंतु काल पर्यंत त्यानी एकाही कर्मचार्यास साधी चौकशी करण्याच्या सूचनाही दिल्या नव्हत्या. कारण या विषयी त्यांच्याकडे पुन्हा चौकशी केली तेव्हा हेच उत्तर त्यांनी दिले. यावरुन या अवैध कारभारास वन विभागच खतपाणी घालतो आहे की काय हा प्रश्न उपस्थित होतो आहे. यातील दोषींची खातेनिहाय चौकशी करुन कारवाई करण्याची आवश्यकता आहे.