माजी नगरसेवक राजाभाऊ बलकवडे यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – शिवसेनेचे माजी नगरसेवक राजाभाऊ बलकवडे यांचे रविवारी रात्री निधन झाले. कोथरुड परिसरात राहणारे राजाभाऊ बलकवडे हे सुरुवातीपासून शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते म्हणून गणले जात. भाजपा शिवसेनेच्या युतीमध्ये ते कर्वेरोड भागातून निवडून आले होते. दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. शिवाजीनगर मतदारसंघाचे शिवसेनेचे विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते.

राजाभाऊ बलकवडे हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले होते. रविवारी रात्री त्यांना त्रास होऊ लागल्याने शाश्वत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथेच त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. सोमवारी सकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/