Pune : सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात निवृत्त IAS अधिकारी मारूती सावंतांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय प्रशासकीय सेवेअंतर्गत कृषी परिषदेचे माजी महासंचालक मारुती हरी सावंत याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश मा.आर.व्ही.आदोने यांनी फेटाळला. आरोपीविरुद्ध सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.कलम ३७६(अ), ३५४(अ) (ब),५०६, बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा २०१२चे कलम ४,६,८,१० तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अ. प्र) अधिनियम १९८९ चे कलम ३(१) (अकरा)(बारा), ३(२) (पाच)व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ कलम६७(अ), ६७(ब) नुसार गुन्हा दाखल आहे. सदरील गुन्हयाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त आणि सध्याचे पुणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी केलेला आहे.

आरोपीने कोरोना महामारी तसेच वय६५ पेक्षा जास्त असल्याच्या कारणावरून व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या दि.१२ मे२०२१ च्या शिफारसीस अनुसरून तात्पुरता जामीन मिळावा म्हणून मे. कोर्टात अर्ज केला होता त्यास विशेष सरकारी वकील ऍड. प्रताप परदेशी यांनी विरोध केला व आरोपीचा अर्ज हा उच्च अधिकार समितीच्या शिफारसीस अनुसरून नसून आरोपी हा उच्च पदस्थ असल्याने व सदरील गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जमीन अर्ज नामंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद केला तो मे. कोर्टाने मान्य केला व आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.