Pune : सख्ख्या मेव्हण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांच्याविरूध्द न्यायालयात चाटशीट दाखल करण्यासाठी पोलिस कोर्टात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – सख्ख्या मेव्हण्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे (MP Sanjay Kakade)यांच्याविरूध्द न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यासाठी पोलिस कोर्टात पोहचले आहेत. पण चार्जशीट दाखल करताना ज्यांच्यावर आरोप आहेत ते हजर असणे गरजेचे आहे पण सध्या तसे झालेले नाही.

याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात खासदार संजय काकडे त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.. याबाबत उषा काकडे यांचे सख्खे बंधु युवराज ढमाले (वय 40, रा. धनकवडी) फिर्याद दिली आहे. युवराज ढमाले हे अनेक वर्षांपासून संजय काकडे यांचे व्यावसायिक भागीदार होते. या भागीदारीतून दोघांमध्ये वाद झाल्याने संजय काकडे यांनी ऑगस्ट 2018 मध्ये घरी बोलावून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे युवराज ढमाले यांनी तक्रारीत म्हटले होते.

या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान आज चतुःश्रुंगी पोलिस चार्जशीट दाखल करण्यासाठी शिवाजीनगर न्यायालयात पोहचले आहेत. अद्याप न्यायालयात या गुन्ह्यांची सुनावणी झालेली नाही. दरम्यान गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर चार्जशीट तयार करण्यात आले आहे. न्यायालयात नेमके काय होणार याकडे राजकीय वर्तुळासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.