Pune : पूना बोर्डिंग हाऊसचे संस्थापक, गणितज्ज्ञ डॉ.श्रीनिवास उडपीकर यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  येथील जुन्या पूना बोर्डिंग हाऊसचे संस्थापक, गणितज्ज्ञ डॉ.श्रीनिवास गुरुराज उडपीकर यांचे दिनांक २२ मे रोजी निधन झाले.

डॉ.उडपीकर यांना गणित या विषयाची प्रचंड आवड होती. नामवंत गणितज्ज्ञ डॉ.श्रीराम अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुणे विद्यापीठातून गणित विषयात डॉक्टरेट मिळवली होती. गणिताचा अभ्यास आणि विविध प्रश्नांची उकल करण्यामध्ये ते नेहमी व्यस्त असायचे. ते विद्यार्थीप्रिय होते. वयाच्या ८१व्या वर्षीही एक उत्सुक प्रवासी, अन्वेषक आणि खाद्यप्रेमी होते. जग भ्रमंतीसाठी सदोदित तयार असणाऱ्या उडपीकरांची रहाणी अगदी साधी होती. फक्त चहाचा कप, ब्रेड बटर, आणि नोटबूक एवढीच त्यांची रहाणीमानाची खासियत होती. पुण्यातील जुन्या पूना बोर्डिंग हाऊसच्या उभारणीत आणि विस्तारात भावंडांबरोबर त्यांचा सहभाग होता.