पुणे: दुपारच्या चार लोकल ३० सप्टेंबरपर्यंत रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत येणार्‍या पुणे ते लोणावळा स्थानकांदरम्यान सलग २० दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. दररोज दुपारी तीन तासांचा हा ब्लॉक असणार आहे. लोहमार्गाची देखभाल दुरुस्ती, सिग्नलिंग सिस्टिम, आदी कामे या काळात करण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे दुपारच्या चार लोकल ३० सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून लोणावळ्याला दुपारी १२.१५ व १ वाजता सुटणार्‍या, तर लोणावळ्याहून पुण्याला दुपारी २ व ३.४० सुटणार्‍या लोकल रद्द केल्या गेल्या आहेत.
[amazon_link asins=’B01DDP7D6W,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’63946f37-b5aa-11e8-a2a1-b52918b4c0fc’]

पुणे-दौंड लोहमार्गावर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे बारामती पॅसेंजर २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान रद्द करण्यात आली होती. परंतु, ब्लॉकचे काम मुदतीपूर्वीच संपल्याने रविवारपासून (दि. ९) ५१४५१/५१४५२ बारामती-पुणे-बारामती पॅसेंजर पुन्हा एकदा पूर्ववत सुरू करण्यात आली.

देखभाल-दुरुस्तीची कामे सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन दिवसात न करता शनिवारी व रविवारी करावीत, अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे.

पोलीसनामा न्युज
ब्रेकिंग न्यूज तसेच राज्यातील आणि देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा… आणि मिळवा पोलीसनामा च्या प्रत्येक बातमीची लिंक
https://t.me/policenamanews