Pune : लष्कराच्या बनावट वेबसाईटव्दारे चौघांना नोकरीचे आमिष; 13.50 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कराची बनावट वेबसाईट (Fake Website) तयारकरून चार तरुणांना लष्करात नोकरी लावण्याच्या आमिषाने साडे तेरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये हा प्रकार घडला आहे.

संसर्ग नियंत्रित करण्यास नैसर्गिक औषध उपयुक्त; जाणून घ्या

डोळ्यांच्या समस्येपासून ‘कब्ज’मध्ये देखील फायदेशीर ठरतात हिरवे धणे, जाणून घ्या 5 चमत्कारी फायदे

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

 

याप्रकरणी भारत कृष्णा काटे (वय 41), राजेंद्र दिनकर संकपाळ, दयानंद जाधव आणि बी के सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सलमान गौसउद्दीन शेख (वय 21, करडखेर गाव, लव्हारा, उदगीर, लातूर) या तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Hair Care : आरोग्यासह सौंदर्याचीही विशेष काळजी घ्या

गर्भावस्थेमध्ये व्हॅक्सीन घेऊ शकतो का? जाणून घ्या होणार्‍या मुलावर त्याचा काय होणार परिणाम

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी लष्कराची वेबसाईट तयार केली होती. त्यांनी फिर्यादी तरुण व आणखी दोघांना लष्करात नोकरी लावतो, असे सांगून प्रत्येकी 6 लाख रुपयांची मागणी केली. तर फिर्यादीचा भाऊ सोहेल शेख याला रेल्वेत तिकीट चेकर म्हणून भरती करण्यासाठी सात लाख रुपये मागितले होते.

जर आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नसाल तर घरी बसून करा Honey Facial, चेहर्‍यावर येईल Instant Glow

 

घरी करा 3 Steps मध्ये हेअर स्पा, केस होतील चमकदार आणि सिल्की; जाणून घ्या

 

तरुणाचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ऐकून 13 लाख 50 हजार रुपये उकळले. त्यांना दिल्ली, झांसी, रांची, लखनऊ, जबलपूर याठिकाणी वेगवेगळी कारणे काढून बोलावले. त्यानंतर त्यांना भारतीय लष्कराचे बनावट नियुक्तीपत्र दिले. मात्र काहीच दिवसात हा प्रकार समोर आला. तरुणांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

रुचिरा जाधवच्या ‘या’ ग्लॅमरस फोटोंवर व्हाल फिदा

कोरोना काळाच्या 15 महिन्यात 23 रुपयांनी महागले पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या सरकार किती वसूल करतंय ‘टॅक्स’