Pune : मोठया आवाजात म्युझिक सिस्टीम लावल्याचा जाब विचारल्यानंतर चौघांकडून महिला व इतरांना बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मोठ्या आवाजात म्युझीक सिस्टीम लावत असल्याने शेजाऱ्यांनी त्याबाबत जाब विचारल्यानंतर चौघांनी महिला व इतरांना बेदम मारहाण करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मुलाचे ऑनलाइन शिक्षणाला त्रास होत असल्याने त्यांनी या चौघांना आवाजाबाबत बोले होते.

याप्रकरणी महादेव अडसूळ (वय 36) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आकाश पवार, विकास पांडव, दत्ता पांडव व ओंकार पांडव यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, जबर मारहाण व इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहत आहेत. दोन ते अडीच वर्षांपूर्वी फिर्यादी हे तिसऱ्या मजल्यावर राहत. तर यातील आरोपी खाली राहत होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत असत. यानंतर फिर्यादी यांनी येथील खोली बदलली. त्यानंतर ते दुसरीकडे राहण्यास गेले. यानंतर देखील त्यांच्यात किरकोळ वाद सुरू होते.

दरम्यान सहा महिन्यांपूर्वी आरोपी हे म्युझीक सिस्टीम मोठ्या आवाजात लावत होते. पण, यावेळी फिर्याद8 यांचा मुलाच ऑनलाइन क्लास सुरू असत. त्यामुनीळे आरोपींनी साऊड सिडती असल्याने त्यांच्यात किरकोळ वाद झाले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. हा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी, त्यांची मावशी, पत्नी व मावस भावाला बेदम मारहाण करत त्यांच्यावर कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न केला आहे. अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.