Pune : ATM सेंटरमध्ये विशिष्ट डिव्हाईस बसवून त्याद्वारे बॅंकेची यंत्रणा हॅककरून फसवणूक; दोघा नायजेरियन तरुणांना पुण्याच्या सायबर गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एटीएम सेंटरमध्ये विशिष्ट डिव्हाईस बसवून त्याद्वारे बँकेची यंत्रणा हॅककरून फसवणूक करणाऱ्या दोघा नायजेरियन तरुणांना पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

डेव्हीड चार्लस (वय 30) आणि केहिंडे हदरिस (वय 29) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दरम्यान यातील मुख्य आरोपी आणि महिला आरोपी पसार आहेत.

मुख्य आरोपी हा कोलंबिया येथील असून, त्याने अश्याच प्रकारे इंदोरमध्ये गुन्हे केले आहेत. दरम्यान, दोघे कोंढवा परिसरात राहत होते. या टोळीने शहरातील विविध एटीएममधून जवळपास 30 ते 35 लाख रुपये काढले आहेत. त्यांनी आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. एक गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात दाखल आहे. गुन्ह्याचा तपास करत असताना शहरातील एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातील काही ठिकाणी हे दोन आरोपी दिसून आले. पण, त्यांचे लोकेशन मिळत नव्हते. यानंतर खबऱ्यामर्फत पोलिसांनी या दोघांचा शोध घेतला. मात्र याच वेळी मुख्य आरोपी पसार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी प्रथम या दोघांना तात्काळ सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 लॅपटॉप, मोबाईल आणि इतर ऐवज जप्त केले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मच्छिद्र पंडित हे करत आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके याच्या मार्गदनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिद्र पंडित, कुमार घाडगे व त्यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

अशी होत होती चोरी…

एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यास गेल्यानंतर आपण कार्ड टाकून पिन काढतो आणि पैसे काढतो. ही सर्व प्रोसेस काही क्षणात होते. पण, आपण कार्ड टाकल्यानंतर संबंधित बँकेच्या सर्व्हरला जाते आणि ते सर्व्हर माहिती चेक करून रिटर्न एटीएम मशीनला ok चा एसमएस पाठवते आणि मग पैसे निघतात. हा सर्व प्रकार होत असताना त्याची माहिती सर्व्हरला असते.

आरोपींनी विशिष्ट डिव्हीईस या मशीनला बसवले होते. त्यातून ही माहिती चोरली आणि त्यामाध्यमातून एटीएम केंद्रातून 4 ते 5 लाख रुपये काढले. त्यांनी शहरातील 4 ते 5 सेंटरमधून 30 ते 35 लाख रुपये काढले आहेत.