Pune : कार खरेदीच्या बहाण्याने एकच कार तिघांना विकून फसवणूक, चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील एका व्यक्तीला त्यांची फॉर्च्युनर कार खरेदी करण्याचा बहाणाकरून एका तरुणाने ती कार घेऊन तीन व्यक्तींना परस्पर विकून फसविल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सतीश पाठक (वय 57) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अभिजित मोहन घोरपडे (वय 24) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार जानेवारी ते मे 2021 काळात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बाणेर येथे राहतात. त्यांच्याकडे एक फॉर्च्युनर कार आहे. त्यांना ती विक्री करायची होती. दरम्यान कार लोनवर घेतली आहे. त्याचे 33 हप्ते भरायचे होते.

यावेळी अभिजित घोरपडे या तरुणाने ही कार खरेदी करायची असल्याचे सांगितले. यानुसार त्यांच्यात व्यवहार ठरला. 33 पैकी 25 हप्ते अभिजित तर 8 हप्ते भरणार होते. मात्र त्याने ही कार स्वतः न वापरता सोलापूरच्या दोन व्यक्तींना आणि सांगली येथील एकाला व्यक्तीला परस्पर विक्री करून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.