Pune Fraud Case | पुणे: आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, आरोपीला जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fraud Case | टेरीटोरीअल आर्मीमध्ये भरती (Army Recruitment) करण्याचे आमिष दाखवत 42 मुलांची 1 कोटी 80 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सुभाष नागेश कुलकर्णी याला कोंढवा पोलिसांनी अटक केली होती. आरोपी सुभाष कुलकर्णी याला प्रथमवर्ग न्याय दंडाअधिकारी लष्कर न्यायालयाचे न्यायाधीश पी.के राठोड (Judge PK Rathod) यांनी जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील ॲड.राजेश चंदू वाघमारे (Adv.Rajesh Chandu Waghmare) यांनी दिली. आरोपी मागील सहा महिन्यापासून येरवडा कारागृहात बंदी होता.

याबाबत महेश पंढरीनाथ ढाके Mahesh Pandharinath Dhaka (वय-35 रा. मुपो. मारुळ, पाटण जि. सातारा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली. पोलिसांनी पांडुरंग मच्छिंद्र कराळे, अंकुश आनंदा शिंदे, राजेश गणपती लोहार, सुभाष नागेश कुलकर्णी (Subhash Nagesh Kulkarni), राजेंद्र दत्तात्रय भोसले, क्रांती कुमार पाटील, कामील अब्दुल गफार, रुद्र प्रताप सिंग यांच्यावर ४०६ ४२०, ४६५ ,४६७, ४६८, ४८१ व १२०(ब) अन्वये गुन्हा दाखल करुन सुभाष कुलकर्णी याला १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी अटक केली होती.(Pune Fraud Case)

काय आहे प्रकरण?

महेश ढाके यांनी दिलेल्या फिर्य़ादी नुसार, फेब्रुवारी 2022 रोजी कामानिमित्त ते पुण्यात आले होते. त्यावेळी कोंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये बसले होते. शेजारी बसलेल्या टेबलवर आर्मीमध्ये आमची ओळख असून मी भरती करतो असे एक व्यक्ती बोलत होता. हे ऐकल्यानंतर तुम्ही खरंच आर्मीमध्ये भरती करता असे विचारले. त्यावेळी आरोपीने माझे आर्मीतील मोठे अधिकारी ओळखीचे आहेत तुमचे कोण नातेवाईक असतील तर सांगा असे सांगून स्वतःचे नाव पांडुरंग कराळे असे सांगून ढाके यांना मोबाईल नंबर दिला.

त्यानंतर आरोपी कराळे याने एक दोन दिवसाआड ढाके यांना फोन करून टेरोटेरियल आर्मी मध्ये भरती निघणार असल्याचे सांगून कोण असेल तर सांगा असे म्हणत होता. ढाके यांनी याबाबत त्याच्या मित्राला सांगितले त्यावेळी मित्राने स्वतःच्या मुलाबाबत कराळेला विचार असे सांगितले. त्यावर आरोपीने एका उमेदवारासाठी ६ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर ढाके यांच्या मित्राच्या मुलाने त्याच्या इतर मित्रांना त्याबाबत सांगितले असे करत 42 उमेदवारांना ढाकेनी तयार केले. या उमेदवारांकडून 1 कोटी 80 लाख यांनी घेत पांडुरंग कराळे याला दिले.

त्यानंतर डाके यांनी कराळे सांगेल त्यावेळी टप्प्याटप्प्याने मुलांना आद्रकी टोल नाका बेळगाव येथे घेऊन गेले.
त्यावेळी आर्मी भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे कराळे यांनी मागवली.
कराळे व त्याच्या इतर साथीदारांनी 42 मुलांची खोटी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर ढाके यांनी लेखी परिक्षेबाबत कराळे यांच्याकडे विचारणा केली त्यावेळी त्यांनी या मुलांची बनावट हॉल तिकीट (Fake Hall Ticket) ढाकेंना पाठवली. त्यानंतर तो परीक्षेची तारीख देत होता. सतत परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याची कारणे देऊ लागला. त्यावर डाके यांनी नक्की परीक्षा कधी आहे ते कळवा नाहीतर पैसे परत करा असे सांगितले असता कराळे यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने ढाके यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

त्यानंतर १२ ऑक्टोंबर २०२३ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणांची १ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोप
ठेवून पांडुरंग मच्छिंद्र कराळे, अंकुश आनंदा शिंदे, राजेश गणपती लोहार, सुभाष नागेश कुलकर्णी, राजेंद्र दत्तात्रय भोसले,
क्रांती कुमार पाटील, कामील अब्दुल गफार, रुद्र प्रताप सिंग यांच्या विरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर न्यायालयातील
न्यायाधीश पी.के राठोड यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सुभाष कुलकर्णी हा मागील सहा महिन्यापासून येरवडा कारागृहात (Yerwada Jail) बंदिस होता.
आरोपी सुभाष नागेश कुलकर्णी याच्या वतीने बचाव पक्ष्याचे वकील म्हणून ॲड.राजेश चंदू वाघमारे यांनी २३ मार्च २०२४ रोजी
प्रथमवर्ग न्याय दंडाअधिकारी लष्कर न्यायालयाचे न्यायाधीश पी.के राठोड यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
अॅड. वाघमारे यांनी न्यायालयात आरोपी सुभाष कुलकर्णी याच्या वतीने जामीन अर्जावर योग्य तो युक्तिवाद केला.
त्याचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी सुभाष कुलकर्णी याचा जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणांमध्ये ॲड. अभय जाधव (Adv. Abhay Jadhav), ॲड.अक्षय सावंत (Adv. Akshay Sawant) यांनी मदत केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | असा पोरकटपणा दाखवाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा विजय कधीच होत नाही, पुरावे माझ्याकडेही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा

Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी