Pune : पुण्यातील अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयाचीच 9.5 लाखांची फसवणूक; लक्ष्मीकांत गुंड विरोधात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अप्पर पोलीस महासंचालक व संचालक कार्यालयाचीच तबल साडे नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. संचालक कार्यालयाचा लॉन्स भाड्याने घेऊन त्याचे पैसे न दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. 2018 ते 2019 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात लक्ष्मीकांत गुंड (रा. धायरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रदीप नाईक (वय 57) यांनी कार्यालयमार्फत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अप्पर पोलीस महासंचालक व संचालक यांचे कार्यालय पो.बि.सं, महाराष्ट्र राज्य याठिकाणी पोलीस कर्मचारी आहेत. दरम्यान संचालक कार्यालयाचे चतु:शृंगी भागात बाणेर येथे वृदावन लॉन्स मंगल कार्यालय आहे. हा लॉन्स भाड्याने करारकरन दिला जातो. त्यानुसार डिसेंबर 2018 मध्ये आरोपी गुंड याला हा लॉन्स भाड्याने दिला होता. दोन महिन्यासाठी करार करण्याच्या बोलीवर विश्वासाने भाड्याने घेतला होता. त्यानुसार त्याने 18 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 असा दोन महिने हा लॉन्स ताब्यात घेऊन त्याचा वापर केला. तर, यानंतर करार करण्यासाठी टाळाटाळ करत दोन महिन्याचे 9 लाख 45 हजार रुपये न देता फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हंटले आहे. भाड्याचे पैसे देत नसल्याने संचालक कार्यालयाने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान गुंड हा पूर्वी राज्यभरात कामगार, सुरक्षा रक्षक तसेच इतर महत्वाच्या गोष्टी पुरवणाऱ्या एका नामांकित कंपनीत काम करत होता. ते काम सोडल्यानंतर तो केटरिंगसह इतर व्यवसाय करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यावेळी त्याने हा लॉन्स भाड्याने घेतला होता. अधिक तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.