Pune : वरिष्ठांच्या मर्जीतील 2 कर्मचार्‍यांची फ्री स्टाईल हाणामारी, चर्चेला ऊत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलात वरिष्ठांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांची यापूर्वी “हुशारी अन भूषारकी” पाहिला मिळाली आहे. असाच काहीसा प्रकार समोर आला असून, वरिष्ठांच्या मी जवळचा असे म्हणाऱ्या पोलीस हवालदार अन कर्मचाऱ्यात तुंबळ फ्री स्टाईल हाणामारीचा खळबळजनक प्रकार घडला आहे. सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या या दोघांची ठाण्याच्या समोरच रस्त्यावर हाणामारी झाल्याने दिवसभर नुस्ती चर्चाच सुरू आहे. पण इतके होऊन वरिष्ठांकडून अद्याप कारवाई न झाल्याने सर्वच आश्चर्य चकित झाले आहेत. कारण शिस्तीचे अन कामप्रिय असणाऱ्या पोलीस आयुक्तांच्या कानावर ही खबर गेली नसल्याचे सांगण्यात येते.

शहरातील शिवाजीनगर मुख्यालयात सायबर पोलीस ठाणे आहे. नुकतेच स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू झाले आहे. भली मोठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची येथे गुन्हे उघडकीस करण्यासाठी नियुक्ती केलेली आहे. जिथं जास्त तिथं तू-तू मै-मै अपेक्षित असते. पण वरिष्ठ खंबीर असल्यानंतर कोणाचाच आवाज निघत नाही. पण पुण्यात यापूर्वी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्याचे प्रकरण घडले आहेत इतकेच नाही तर अधिकाऱ्यांना देखील हे जुमानत नसल्याचे पाहिला मिळालेले आहे. आता सायबर पोलीस ठाणे जरी नुकतेच सुरू झोले असले तरी तिथेही या घडामोडी सुरू झाल्याचे दिसत आहे. कारण, काल ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांमध्ये “फ्री स्टाईल” हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. मेडिकल कागदपत्रांवरून ही हाणामारी झाली आहे.

संबंधित पोलीस हवालदारावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याचे सांगितले जाते. तो ड्युटी अंमलदार (डिओ) आहे. तर दुसरा कर्मचारी हा मेडिकल रजेवर आहे. त्याची काही कागदपत्रे देवाण-घेवाण करताना काल दुपारी या दोघात किरकोळ वाद झाले. पण याचे रूपांतर हाणामारीत झाले. वाद झाल्यानंतर तो कर्मचारी ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावर आला होता. पण वरिष्ठांचा लाडका असणाऱ्या या हवालदाराने त्याला मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे सांगण्यात येते.

याप्रकरणानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधिताविरुद्ध कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करत आहेत. याबाबत आर्थिक गुन्हे व सायबर शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी विभागाकडून माहिती घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.