Pune : फरार असलेल्या गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन वेश्या व्यवसायाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी (anti ransom squad) पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

शेखर प्रल्हाद साळुंखे (वय 42, रा. साई तारा बिल्डिंग, बुधवार पेठ) असे पकडलेल्याचे नाव आहे.

पाहिजे असलेल्या आरोपींची माहिती काढली जात आहे. यादरम्यान खंडणी विरोधी पथक (anti ransom squad) एकचे अधिकारी आणि कर्मचारी पेट्रोलिंग करत होते.
यावेळी पोलीस अंमलदार ओंबासें यांना शेखर यांच्याबाबत माहिती मिळाली.

आवळ्याच्या रसामध्ये लपलेले आहेत आरोग्य रहस्य, जाणून घ्या

त्याला नू.म.वि. शाळेसमोर पकडण्यात आले. पुढील कारवाई करण्यासाठी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, यशवंत ओंबसे, मधूकर तूपसुंदर, रवींद्र फुलपगारे, रमेश चौधर, नितीन कांबळे, गजानन सोनुळकर, हनुमंत कांदे, अमर पवार यांच्या पथकाने केली आहे.

मोदी सरकारचा भाडेकरूंसाठी मोठा निर्णय ! नवीन कायद्यानुसार पहिल्यांदाच मिळणार ‘हे’ अधिकार, जाणून घ्या

Pune : भाजी विकताना जोरात ओरडला म्हणून भाजीविक्रेत्याच्या पोटात चाकू भोसकला; रविवार पेठेत 15 ते 20 जणांच्या जमावाकडून हल्ला

‘दरवाजा बंद होता म्हणून पंतप्रधानांच्या बैठकीला येता आले नाही’

रस्त्यावर भाजी विक्री करताना जोरजोरात ओरडून मोठा आवाज केला म्हणून झालेल्या वादातून १५ ते २० जणांच्या टोळक्याने भाजीविक्रेत्यांवर हल्ला केला.
आरोपींनी भाजीविक्रेत्यांच्या पोटात चाकूने पोटात भोसकल्याने ते गंभीर जखमी झाला आहे.

Walking Tips : चुकूनही चालताना करु नका ‘ह्या’ चुका, आरोग्याचे होऊ शकते मोठे नुकसान

फरासखाना पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली. वाजीद बशीर शेख (वय 35, रा. 715, सरोज अपार्टमेंट, नाना पेठ ), शब्बीर इक्बाल टिनवाला (वय 30), इस्माईल शब्बीर पुनावाला (वय 35), तरबेज इब्राहिम शेख (वय 36),तरबेज इब्राहिम शेख (वय ३६) आणि अल्लाउद्दीन इमामुद्दीन शेख (वय 40, चौघे रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

Pune : गरवारे शाळेत तरुणाचा खुन; आरोपींने स्वत येऊन सांगितला पोलिसांना घटनाक्रम

त्यांच्यासह आणखी 18 जणांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अनिरुद्ध इनामदार (वय 20, रा. रविवार पेठ रा. 650, रविवार पेठ, काची आळी) यांनी फिर्याद दिली.
पोटात चाकू लागल्याने देवांग सचिन कंट्रोल्लू (वय 19, रा. काची आळी) हा जखमी झाला असून त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवार पेठेत मंगळवारी (ता. १) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

महिलांनो, फिटनेसच्या नादात ‘हे’ करू नका, जाणून घ्या
अटक केलेल्या आरोपीकडे तपास करीत गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करायची आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकू तसेच मारहाण करण्यासाठी वापरलेले इतर साहित्य जप्त करण्यासाठी, पोलिसांसमोर भाजीविक्रेत्यांना मारहाण झाली असून त्यामागचे नेमके काय कारण आहे?
याचा शोध घेण्यासाठी अटक केलेल्या 5 ही आरोपीस 7 दिवसाची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.
न्यायालयाने त्यांना 7 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.