Pune Ganesh Utsav 2022 | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी 5 दिवस परवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganesh Utsav 2022 | सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी ५ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी निर्गमित केला आहे.

 

पुण्यातील सार्वजनिक गणपतींचे देखावे व आरास पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास ४ ऐवजी ५ दिवस परवानगी देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला. (Pune Ganesh Utsav 2022)

 

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सुट दिलेल्या गणेशोत्सवाखेरीज इतर सण,
उत्सव तसेच ठेवून जिल्ह्यातील गणेशोत्सवासाठी शनिवार, ३ सप्टेंबर, रविवार, ४ सप्टेंबर, मंगळवार ६ सप्टेंबर, बुधवार,
७ सप्टेंबर आणि शुक्रवार, ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत एकूण ५ दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title : –  Pune Ganesh Utsav 2022 | 5 days permission for use of loudspeakers during pune Ganeshotsav 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा