Pune Ganpati Visarjan 2022 | पुण्यातील मानाच्या 5 गणपतींचे परंपरेनुसार विसर्जन, 11 तास चालली विसर्जन मिरवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganapati Visarjan 2022 | पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन (Kesariwada Ganpati) झाले आहे. त्याचसोबत मानाच्या पाचही गणपतींचे (Manache Ganpati) परंपरेनुसार विसर्जन (Pune Ganpati Visarjan 2022) झाले. डेक्कन येथील महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) हौदामध्ये या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आलं असून यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळालं. जवळपास 11 तास मिरवणुका चालल्या.

पुण्यातील पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचे (Kasba Ganpati) 4.15 मिनिटांनी तर मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं (Tambadi Jogeshwari Ganpati) विसर्जन सायंकाळी 5.30 वाजता झालं. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीचे (Guruji Talim Ganpati) विसर्जन 7.22 मिनीटांनी झालं तर मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे (Tulshibagh Ganpati) विसर्जन 8.02 वाजता झाले. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडी गणपतीचे विसर्जन रात्री 8.50 वाजता झालं. यावेळी लेझिम आणि ढोल-ताशांच्या गजरात अवघं पुणे दुमदुमल्याचं दिसून आले.

मानाच्या गणपतींचे विसर्जन (Pune Ganapati Visarjan 2022) झाल्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली.
भाऊ रंगारी गणपती (Bhau Rangari Ganpati) मंडळाची विसर्जन मिरवणूकीत पाच ढोल ताशाचे पथक असणार आहेत.
त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Halwai Ganapati) बेलबाग चौकात (Belbagh Chowk) पोहोचण्यास नेहमीपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे.
जिलब्या मारुती (Jilbya Maruti), भाऊ रंगारी, अखिल मंडई मंडळ (Akhil Mandai Mandal) यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकात येईल.

Web Title :- Pune Ganesh Visarjan 2022 | anant chaturdashi celebration pune

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pankaja Munde | भाजपमध्ये मोठे फेरबदल, विनोद तावडे, पंकजा मुंडेंवर मोठी जबाबदारी; पंकजा मुंडेंची नाराजी मावळणार?

Shinde Government | शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीचा शासन आदेश जारी, थेट खात्यात रक्कम जमा होणार