×
Homeताज्या बातम्याPune Ganeshotsav 2022 | पुण्यात गणपती मुर्ती विक्रीचे 249 अनधिकृत स्टॉल; अनधिकृत...

Pune Ganeshotsav 2022 | पुण्यात गणपती मुर्ती विक्रीचे 249 अनधिकृत स्टॉल; अनधिकृत विक्रेत्यांवर पोलिस कारवाई करणार – माधव जगताप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganeshotsav 2022 | शहरात स्टॉल थाटून गणपती मुर्तींची विक्री करणारे अनधिकृत २४९ स्टॉलधारक आढळले आहेत. त्यापैकी ११८ जणांना आतापर्यंत नोटीस देण्यात आली आहे. अनधिकृत स्टॉलधारकांविरोधातील सर्व पुरावे गोळा करून पोलिसांकडे तक्रार देणार असल्याचे महापालिकेच्या Pune Minicipal Corporation (PMC) अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी सांगितले.

 

जगताप यांनी सांगितले, की वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या बेकायदा विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू आहे.
तसेच गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगीनुसारच मंडप उभारलेत का याचीही तपासणी सुरू आहे.
अतिक्रमण निरीक्षकांच्या पाहाणीमध्ये शहरात विविध ठिकाणी अनधिकृतरित्या २४९ गणेश विक्रीचे स्टॉल उभारण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
विशेष असे की महापालिकेने शहराच्या विविध भागामध्ये गणेश विक्रीच्या स्टॉल्ससाठी ओपन स्पेसेस उपलब्ध करून दिल्यानंतरही एवढ्या मोठ्या संख्येने अनधिकृत स्टॉल्स उभारले आहेत.
यापैकी ११८ स्टॉल धारकांना नोटीस बजावण्यात आली असून उर्वरीत स्टॉलधारकांना पुढील दोन दिवसांत नोटीस बजावण्यात येईल.
स्टॉलच्या ठिकाणाचे जीओ मॅपिंग व विक्रेत्यांची संपुर्ण माहिती घेउन संबधित पोलिस ठाण्याकडे देण्यात येणार आहे.
पुढील टप्प्यात या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश अतिक्रमण निरीक्षकांना देण्यात आले आहेत. (Pune Ganeshotsav 2022)

 

सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांची देखिल तपासणी सुरू करण्यात आली आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत याचा संपुर्ण अहवाल उपलब्ध होईल.
यासोबतच मंडळांना परवानगी घेउनच जाहीरात कमानी उभारण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
मात्र, काही ठिकाणी परवानगी नसलेल्या ठिकाणी देखिल कमानी उभारण्यात आल्याने संबधित मंडळांना कमानी काढून घेण्याची नोटीस दिल्याचे माधव जगताप यांनी नमूद केले.

 

Web Title : –  Pune Ganeshotsav 2022 | 249 unauthorized stalls selling Ganpati idols
in Pune Police will take action against unauthorized sellers Madhav Jagtap

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News