Pune Ganeshotsav 2022 | गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganeshotsav 2022 | गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दिले आहेत. गणेशोत्सवात गणपतीच्या (Pune Ganeshotsav 2022) आरतीनंतर प्रसाद वाटप होते. विषबाधेच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेबाबत काळजी (Cleanliness) घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

 

वेळोवेळी प्रसादाच्या सेवनातून विषबाधा (Poisoning) झाल्याच्या काही घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही वेळा भाविकांनी तयार करून आणलेल्या प्रसादाचे वाटप केले जाते. या प्रसादाबद्दल कार्यकर्त्यांना कोणतीच कल्पना नसते. त्यामुळे गणेशोत्सवातील ( Pune Ganeshotsav 2022) प्रसाद सुरक्षित असेल याकडे अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष असणार आहे.

 

गणपती मंडळांनी (Ganapati Mandal) स्वतः तयार केलेल्या प्रसादाचे वाटप करावे. प्रसादासाठी वापरला जाणारा शिधा व अन्न पदार्थांची गुणवत्ता तपासावी. प्रसाद करण्याच्या ठिकाणी स्वच्छता बाळगावी. तयार प्रसाद थंड करण्यासाठी स्वच्छ जागेचा वापर केल्यास प्रसाद दूषित होण्याची शक्यता कमी होते. प्रसादात शक्यतो कोरड्या पदार्थांचा समावेश करावा.

सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती इत्यादी अन्न पदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी
असल्याने त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनातर्फे या
अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या संबंधित आस्थापनांच्या तपासण्या व नमुने घेण्यासाठी
विशेष मोहिम डिसेंबर 2022 पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे
सहआयुक्त संजय नारागुडे (Joint Commissioner Sanjay Naragude) यांनी दिली आहे.

 

Web Title :- Pune Ganeshotsav 2022 | Food and Drug Administration Department instructs Ganesh Mandals to follow rules

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP MLA Amol Mitkari | राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अमोल मिटकरी निधीसाठी कमीशन घेतात, थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

Pune ACB Trap on Divisional Inspector | मिळकत कर नावावर करुन देण्यासाठी
20 हजार रुपये लाचेची मागणी, पालिकेच्या विभागीय निरीक्षकावर एसीबीकडून FIR

Pune Ganeshotsav 2022 | पुण्यात गणपती मुर्ती विक्रीचे 249 अनधिकृत स्टॉल; अनधिकृत विक्रेत्यांवर पोलिस कारवाई करणार – माधव जगताप