Pune Ganeshotsav 2022 | गणेशोत्सवानिमित्त पुण्यात ‘या’ दिवशी मद्य विक्री बंद राहणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganeshotsav 2022 | कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सवासह इतर सणांवर निर्बंध होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने (State Government) सर्व सण उत्सव उत्साहात साजरे करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. पुण्यात गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2022 ) मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या काळात कायदा व सुव्यवस्था (Law and Order) अबाधित ठेवण्यासाठी गणेश स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी दारूचे दुकान बंद (Liquor Shop Closed) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Collector Rajesh Deshmukh) यांनी हे आदेश काढले आहेत.

 

या दिवशी मद्य विक्री बंद असेल

यंदा पुणेकर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा (Pune Ganeshotsav 2022 ) करणार आहेत.
त्यासाठी शहरात जय्यत तयारी केली जात आहे. पुणे पोलीस (Pune Police) देखील गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहेत.
या गणेशोत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
गणेश चतुर्थी (दि. 31 ऑगस्ट) आणि अनंत चतुर्दशी (दि.9 सप्टेंबर) या दोन दिवशी पुणे जिल्ह्यात दारु विक्री बंद ठेवण्यात आली आहे.
तर पाचव्या आणि सातव्या दिवशी ज्या परिसरात विसर्जन केलं जातं त्या परिसरात मद्यविक्री करणारी दुकाने, परमीट रुम आणि बिअर बार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच अनंत चतुर्थीच्या दिवशीच्या मिरवणुकासंपेपर्यंत त्या मार्गावरील सगळे दारु विक्रीकेंद्र बंद असणार आहेत.

 

तातडीने कारवाई होणार

पाच दिवस कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात दारु विक्रीला बंदी करण्यात आली आहे.
सगळ्या दारु विक्रेत्यांना या संदर्भात सुचना देण्यात आल्या आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.

 

7500 पोलिसांचा बंदोबस्त

पुणे पोलिसांनी गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देण्यात आली.
शहरात 3600 सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. या मंडळांना देखील सूचना करण्यात आल्या आहेत.
तसेच गणपती मंडळांच्या गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे.
शहरात 7500 पोलीस तैनात ठेवले जाणार आहेत.

 

Web Title : –  Pune Ganeshotsav 2022 | sale of liquor is banned in pune for two days orders of collector dr rajesh deshmukh pune 

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा