Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganeshotsav 2023 | मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये कोयता गँगने (Koyta Gang) उच्छाद मांडला आहे. मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये कोयता गँगने हदशत निर्माण करुन नागरिकांना वेठीस धरले आहे. यावर पुणे पोलिसांकडून (Pune Police) कठोर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, कोयता गँगचे प्रतिबिंब गुरुवारी विसर्जन मिरवणुकीत उमटल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील वैभव मित्र मंडळाने कोयता गँग बाबत जनजागृती करणारा देखावा साकारला होता. या देखाव्याने मिरवणुकीचे (Pune Ganeshotsav 2023) लक्ष वेधून घेतले.

हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या पुण्यातील कोयता गँगची मोठी चर्चा राज्यभरात गाजली. याचे पडसाद विधान परिषदेत देखील उमटले होते. पुण्यातील अल्पवयीन मुले, तरुणांनी टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी कोयता घेऊन हल्ला करणे, धमकावण्याचे प्रकार मागील काही महिन्यात घडले आहेत. पुणे शहरातील विविध भागातील कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तांना गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाईचा बडगा उगारला आहे.

दरम्यान, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत (Pune Ganeshotsav 2023) याचे प्रतिबंब उमटल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यातील कोयता गँगबाबत जनजागृती करण्यासाठी वैभव मित्र मंडळाने थेट देखावाच साकारला होता.
त्यात गणरायासह कोयता गँगला थेट आव्हान दिलेले पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची छबी दाखवण्यात आली होती.
‘एका कोयत्यामुळे आयुष्य बरबाद करु नका’, असा संदेश देखाव्यातून देण्यात आला.
तर ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…मग दाखवतो तुम्हाला बल्ले बल्ले…’ असा इशारा देणारा देखावा सादर
करण्यात आला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule | ‘जे अशी भूमिका घेतात, त्यांच्याबद्दल…’, बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Pune Metro – Chandrakant Patil | गणपती विसर्जनावेळी पुणेकरांचा मेट्रोला अभूतपूर्व प्रतिसादाला सलाम ! अनंत चतुर्दशीला दीड लाखापेक्षा जास्त पुणेकरांचा मेट्रोने प्रवास

Pune Ganeshotsav 2023 | बाप्पाला निरोप देताना कुटुंबाचं मुलाकडं दुर्लक्ष, चार वर्षाच्या चिमुकल्यानं घेतला अखेरचा निरोप; मायलेकरांचा ‘तो’ सेल्फी ठरला अखेरचा, पिंपरी-चिंचवड परिसरातील घटना

MNS Chief Raj Thackeray | ‘…तर गालावर वळ उठतील हे निश्चित’, मुलुंड प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा; सरकारलाही धरले धारेवर