Pune Ganeshotsav 2023 | गणेशोत्सवात पुण्यात येणाऱ्या गणेश भक्तांची पार्किंगची चिंता मिटली, जाणून घ्या कुठे करता येणार पार्किंग?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2023) जगभरात प्रसिद्ध आहे. हा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात पुण्यातील मध्यवस्थित होणारी वाहतूक कोंडी (Pune Traffic Jam) बघता प्रशासनाने वाहनतळांच्या जागा निश्चित केल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2023) काळात पुण्यात येणाऱ्या गणेश भक्तांची वाहन पार्किंगची (Car Parking) चिंता मिटली आहे. काही ठिकाणी नि:शुल्क तर काही ठिकाणी ‘पे ॲन्ड पार्क’ (Pay and Park) असेल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी उत्सवाच्या कालावधीत मध्यवस्तीत कमीत कमी वाहने आणावे, असे आवाहन प्रशासनाकाडून करण्यात आले आहे. (Pune News)

अशी असेल पार्किंग व्यवस्था (Pune Ganeshotsav 2023)

पेठ परिसर

  • शिवाजी आखाडा वाहनतळ – 100 दुचाकी, 20 कार
  • न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग – 40 दुचाकी
  • गोगटे प्रशाला – 60 दुचाकी

देसाई महाविद्यालय – पोलिस वाहनांसाठी पार्किंग

  • स.प. महाविद्यालय सुमारे – 120 दुचाकी
  • शिवाजी मराठा विद्यालय – 25 दुचाकी
  • नातूबाग – 100 दुचाकी
  • पीएमपी मैदान, पूरम चौकाजवळ – 25 कार
  • हमालवाडा, पत्र्या मारुतीजवळ – 300 दुचाकी, 50 कार
  • नदीपात्रालगत – 300 दुचाकी, 80 कार

भारती विद्यापीठ परिसर

  • पीएमपी टर्मिनल कात्रज – 30 दुचाकी, 40 कार
  • राजीव गांधी प्राणी संग्रहालय – 350 दुचाकी, 70 कार
  • संतोषनगर, कात्रज भाजी मंडई – 30 दुचाकी, 30 कार

सिंहगड रस्ता परिसर

  • सणस शाळा, धायरी – 120 दुचाकी
  • राजाराम पूल ते विठ्ठलवाडी कमान चर्चची जागा – 100 कार

दत्तवाडी परिसर

  • सारसबाग, पेशवे पार्क – 100 दुचाकी
  • हरजीवन रुग्णालयासमोर, सावरकर चौक – 30 दुचाकी
    -पाटील प्लाझा पार्किंग – 100 दुचाकी
  • मित्रमंडळ सभागृह – 30 दुचाकी
  • पर्वती ते दांडेकर पूल – 100 दुचाकी
  • दांडेकर पूल ते गणेश मळा – 300 दुचाकी
  • गणेश मळा ते राजाराम पूल – 400 दुचाकी
  • नीलायम टॉकीज – 100 दुचाकी, 80 कार

डेक्कन परिसर

  • विमलाबाई गरवारे हायस्कूल – 100 दुचाकी
  • आपटे प्रशाला – 100 दुचाकी
  • आबासाहेब गरवारे महाविद्यालय – 200 दुचाकी, कार
  • फर्ग्युसन महाविद्यालय – 500 दुचाकी आणि कार
  • मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय – 100 दुचाकी
  • संजीवन वैद्यकीय महाविद्यालय – 150 दुचाकी, कार
  • जैन वसतिगृह, बीएमसीसी रस्ता – 200 दुचाकी, कार

शिवाजीनगर परिसर

  • सीओईपी महाविद्यालय – 250 ते 300 दुचाकी, कार
  • एसएसपीएमएस महाविद्यालय – 250 दुचाकी

कोंढवा परिसर

  • भक्ती वेदांत पार्किंग – 300 दुचाकी, कार

हंडेवाडी परिसर

  • दादा गुजर शाळा – 500 दुचाकी
  • जुने इदगाह मैदान, चिंतामणी नगर – 1000 दुचाकी
  • भानगिरे शाळा – 800 दुचाकी

हडपसर परिसर

  • बंटर स्कूल – 100 दुचाकी, 50 कार
  • एस.एम. जोशी स्कूल – 200 दुचाकी, 50 कार

मुंढवा परिसर

  • पीएमपी बस थांबा, सप्तशृंगी माता मंदिराजवळ – 60 दुचाकी

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Toll Hike | मुंबईचा रस्तेप्रवास महागला; पथकराच्या दरामध्ये झाली वाढ,1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू