
Pune Ganeshotsav 2023 | गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचं उल्लंघन, लक्ष्मी रोडवर 101.3 तर खंडूजीबाबा चौकात तब्बल 129 डेसिबल!
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganeshotsav 2023 | गुरुवारी संध्याकाळी (दि. 28) ढोलताशांचे, ध्वनिवर्धकांच्या भिंती यांनी गणेश विसर्जन मार्गावर आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत (Pune Ganeshotsav 2023) लक्ष्मी रोडवर (Lakshmi Road) सरासरी 101.3 डेसिबल ध्वनिपातळीची (Sound Level) नोंद झाली. त्यातही रात्री आठ वाजता खंडूजीबाबा चौकात (Khandujibaba Chowk) तब्बल 129 डेसिबल ध्वनिपातळी नोंदवण्यात आली. टिळक रस्त्यावर 100 डेसिबलपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवला जात असल्याने अनेकांचा थरकाप उडाला होता.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (COEP Technological University) उपयोजित विज्ञान आणि मानव्यविज्ञान विभागामार्फत विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाची मोजणी करण्यात आली. यंदा या उपक्रमाचे 23 वे वर्ष होते. डॉ. शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन जयवंत नांदोडे आणि इशिता हुमणाबादकर यांनी केले. उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आवाजाच्या नोंदी घेऊन आकडेवारीचे विश्लेषण केले.
केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या निकषांनुसार दिवसा निवासी क्षेत्रात 55 डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात 75 डेसिबल रात्री
निवासी क्षेत्रात 45 डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात 70 डेसिबल ध्वनिपातळी असणे अपेक्षित आहे.
मात्र, गणपती विसर्जन मिरवणुकीत (Pune Ganeshotsav 2023) गणेश मंडळे, ढोल-ताशा पथक, ध्वनिवर्धकांकडून
या मर्यादेचे उल्लंघन केल्याचे आकडेवारीवरुन सिद्ध होते. मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रोडवर सरासरी
105 डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा किंचित घट झाली.
परतु, नोंदवण्यात आलेली ध्वनिपातळी ही आरोग्यास हानिकारक मानली जात आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा
Pune PMC News | पीएमसी इंजीनियर असोसिएशनच्या वतीने ‘अभियंता दिन सायकल रॅली 2023’ चे आयोजन