‘संस्कृती’ जपणाऱ्या ‘निंबाळकर तालीम’ मंडळाने साकारला तिरुपती ‘बालाजी’ मंदिराचा देखावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचा गणेशोत्सव हा दिवाळी एवढाच मोठा सण किंवा उत्सव समजला जातो आणि साजरा देखील केला जातो. या पुण्यात मानाच्या गणपतीबरोबर इतर अनेक मोठ मोठी आणि स्वत:ची वेगळी ओळख जपलेले गणेश मंडळ आहे. ज्यांनी पुण्याची संस्कृती आज देखील जपली आहे. त्यात एक आहे निंबाळकर तालीमचा गणपती.


गणेशोत्सवामध्ये शास्त्रीय संगीताची मैफील सुरू करून पुणेकरांची अभिजातता घडवत संस्कृती जपणारे मंडळ असा निंबाळकर तालीम मंडळाचा लौकिक आजही तसाच आहे. यंदा हे मंडळ शताब्दी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्त मंडळाने यंदाच्या उत्सवात तिरुपती येथील बालाजी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सांस्कृतिकता जपणारे मंडळ ही ओळख मंडळाकडून सातत्याने जतन केली जाते. बालाजी मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविक मोठ्या भक्ती भावाने गणरायाच्या दर्शनासाठी येत आहे.


मामासाहेब मोहोळ, बबनराव मानकर, शिवरामपंत दामले यांच्यामुळे निंबाळकर तालमीचे नाव प्रसिद्धस आले. चौकामध्ये पिठाची गिरणी चालविणारे दादासाहेब कुदळे हे जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळविलेले विद्वान होते. केदार गोखले, राघवेंद्र मानकर, अशोक कोंढाळकर हे तरुण कार्यकर्ते आता मंडळाची सांस्कृतिकता जपत आहेत.  हीच संस्कृती जपण्यासाठी यंदाही हा बालाजी मंदिराच्या प्रतिकृता देखावा साकारण्यात आला आहे.
You might also like