Pune Ganeshotsav |अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांकडून आवाहन, कोणतेही नवे निर्बंध नसल्याचा निर्वाळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Ganeshotsav | उद्या गणरायाचं आगमन होत आहे. गणरायाच्या आगमनासाठी सर्वच भक्तमंडळी सज्ज आहेत. यंदाही उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदाचा गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) साधे पणाने साजरा करा असे आवाहन राज्य शासनाकडुन (State Government) देण्यात आले आहे. या उद्देशाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी पुण्यात (Pune) गणेशोत्सवाचे 10 दिवस जमावबंदी लागु करण्यात आली असल्याची माहती प्रसारित होते आहे. मात्र, पुण्यात कोणतेही नवे निर्बंध नसल्याचा निर्वाळा पोलिसांकडून करण्यात आला आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील पुणे पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

गणेशोत्सवादरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Ravindra Shisve) यांनी दिला आहे.

पुणे शहर पोलीसांनी (Pune City Police) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी (Pune Ganeshotsav) आचारसंहिता तयार केलीय. बंदोबस्तावरील पोलिसांकडून या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शहरातील गणेश मंडळांनी साध्यापद्धतीने उत्सव साजरा करण्यास करण्यास सहमती दर्शविली आहे. मंडळांनी आचरसंहितेचे पालन करून सर्वोतोपरी पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी देखील आपली एक सामाजिक जबाबदारी समजून स्वयंशिस्त पाळून पोलिसांना सहकार्य करावे असंही सांगितलं आहे. दरम्यान, पोलिसांकडून बंदोबस्ताच्या ठिकाणी मनुष्यबळ तैनात करण्यात आले असले तरी, महत्वाच्या ठिकाणावर CCTV कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. गर्दीची ठिकाणे, महत्वाची मंडळी यांची मंदिरे व मंडपात कॅमेरे लावण्यात येणार आहे

गणेशोत्सवासाठी असा असणार बंदोबस्त –

सुमारे 7 हजार पोलिस कर्मचारी

700 अधिकारी

शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियत्रण कक्ष राज्य राखीव पोलिस दलाच्या, तुकड्यांचा समावेश.

 

गुन्हे शाखेचा देखील वेगळा बंदोबस्त –

प्रत्येक पथकामध्ये 100 कर्मचारी

बॉम्ब शोधक व नाशक पथक

घातपात विरोधी कारवाईसाठी विशेष शाखा

वाहतूक पोलिस

 

Web Title : Pune Ganeshotsav | rules & regulations during ganeshotsav

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर, जाणून घ्या विधानसभा मतदार संघ निहाय अध्यक्ष अन् पदाधिकार्‍यांची नावे

Mobile SIM | खुशखबर ! तुमच्याकडे सुद्धा आहे का ‘या’ कंपनीचे सिम? तर फ्रीमध्ये मिळेल 4 लाखाचे बेनिफिट, असा घ्या फायदा

ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात