Pune Gang Rape | पुणे हादरलं | नवरा हॉस्पीटलमध्ये असल्याचं समजताच नराधमांनी केली ‘गेम’, 29 वर्षाच्या विवाहितेला गोठयात डांबून केला ‘गँगरेप’

पुणे / भोर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात (Bhor) घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भोर तालुक्यातील भांबवडे गावात एका 29 वर्षाच्या विवाहित महिलेवर गावातील दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार (Pune Gang Rape) केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेचा पती रुग्णालयात उपचार घेत असताना नराधमांनी डाव साधला. पीडित महिलेला गोठ्यात डांबून ठेवत तिच्यावर सामूहिक बलात्कार (Pune Gang Rape) केला.

हा खळबळजनक प्रकार राजगड पोलीस ठाण्याच्या (Rajgad Police Station) हद्दीत घडला असून पीडित महिलेने शनिवारी (दि.7) फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्कारासह (Pune Gange Rape) अन्य कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन तीन संशयित आरोपींना ताब्यात (Arrest) घेतले आहे. अनिल वाडकर, महेश सोनवणे आणि हनुमान कापरे (रा. भांबवडे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. यावेळी पीडित महिलेचे पती शिरवळ (Shirwal) येथील एका रुग्णालयात उपचार घेत होते. त्या दरम्यान फिर्यादी शेतात जाताना आरोपींनी फिर्यादीच्या पतीने मोबाईल चार्जर व पँट मागितल्याचे सांगितले. त्यावर स्वत: जाऊन देईन असे पीडितेने सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी तिला धमकी देऊन निघून गेले.

Viral News | पतीला ‘कुत्रा’ बनवून रेल्वे स्टेशनवर घेऊन गेली महिला, गळ्यात साखळी बांधून फिरवले; जाणून घ्या प्रकरण

या प्रकारामुळे फिर्यादी घाबरुन शेतातील पिकात लपून बसल्या. सायंकाळी सहा वाजता घरी जाताना गुरांना चारा घालण्यासाठी गोठ्यात गेल्या.
त्यावेळी अनिल वाडकर (Anil Wadkar) व महेश सोनवणे (Mahesh Sonawane) यांनी गोठ्यात येऊन पीडितेवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार (Pune Gang Rape) केला.
याप्रकरणी पीडित महिलेने शनिवारी (दि.7) स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे.

पीडित महिलेने फिर्याद दिल्यानंतर आरोपींच्या पत्नीने पीडितेच्या नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे.
आरोपीने ऑक्टोबर 2020 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत भांबवडे आणि कापूरहोळ येथील लॉजमध्ये नेत जबरदस्तीने बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे महापालिकेची ‘टॉयलेट’ कथा ! ‘मलिदा’ घेऊन बिल्डरच्या फायद्यासाठी 20 लाख रुपये खर्चून उभारलेले ‘स्वछतागृह’ मध्यरात्री ‘जमीनदोस्त’

ST Workers Agitation | ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार ! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसे मैदानात उतरणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Gang Rape | after knowing her husband is hospitalized 2 men gang raped 29 years old married woman in cowshed of bhor pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update