Pune Gang rape News | धक्कादायक ! पुण्यात फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 जणांकडून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पाच मित्रांकडून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape on Minor Girl) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपींनी दोन वर्षापासून फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threat to Viral Photos) देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे. आरोपींनी कधी अलिशान वाहनात तर कधी लॉजवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang rape) केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने गुरुवारी रात्री आळेफाटा पोलीस ठाण्यात (alephata police station) तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह (POCSO) अन्य कलमांतर्गत चार आरोपींना अटक (Arrest) केले आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे. pune gang rape news | gang rape of a minor girl by five friends in pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

निखिल पोटे (Nikhil Pote), दया टेमगिरी (Daya Temgiri), विकी पोटे (Vicky Pote), बंटी तितर (Bunty Titar), यश गाडेकर (Yash Gadekar) असे गुन्हा (FIR) दाखल झालेल्या सर्व आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी 18 वर्षावरील आहे. संबंधित आरोपींनी काही दिवसांपूर्वी पीडीत मुलीशी ओळख करुन तिचे फोटो काढले होते. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच मित्रांनी दोन वर्ष सामूहिक बलात्कार (Gang rape) केला आहे. त्याचबरोबर आरोपींनी पीडितेच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मुलगी मागील दोन वर्षापासून हा त्रास सहन करत होती.

आरोपींनी नगर रोडवरील (Nagar Road) एका लॉजवर 15 जून 2019 ते 15 जून 2021 या दरम्यान वेगवेगळ्या गाड्यांमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मागील दोन वर्षापासून आपल्या वयापेक्षा कमी वयाच्या मुलीवर नरक यातना आरोपींनी दिल्या आहेत. पोलिसांनी पाचही मित्रांवर गुन्हा दाखल (FIR) केला आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एकजण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एक अलिशान चारचाकी ताब्यात घेतली आहे. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार (alephata police station Police Inspector Madhukar Pawar) पुढील तपास करित आहेत.

Web Titel :- pune gang rape news | gang rape of a minor girl by five friends in pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू