Pune Gang Rape | वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरण : ‘त्या’  मुलीवर ठाण्यात आणखी एका तरूणाने केला अत्याचार

पुणे : Pune Gang Rape | मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित मुलगी पुणे स्टेशनवरून रेल्वेने दादर (Dadar Railway Station) येथे उतरल्यानंतर ठाण्यातील (Thane) एका 32 वर्षीय तरुणाने तिला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार (Pune Gang Rape) केल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी आरोपीस वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) अटक केली आहे.  राजेश शांताराम कुंभार (वय 32, रा. शांताबाई चाळ, कोपरी, ठाणे पूर्व ) असे अटक आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 20 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एकुण 17 आरोपींविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rahul Gandhi | राहुल गांधींचा RSS वर निशाणा; म्हणाले – ‘महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या, मोहन भागवत यांच्यासोबत का नाही?’

संबंधित 14 वर्षीय मुलगी 31 ऑगस्ट रोजी तिच्या एका मित्रास भेटण्याकरिता घरी कोणास काही न सांगता पुणे रेल्वे स्टेशनवर गेली होती.
परंतु, रात्री उशिरा गाडी नसल्यामुळे राहण्याची व्यवस्था करतो असे सांगत एका रिक्षाचालकाने तिला वानवडी येथे नेऊन तिच्यावर साथीदारांसह बलात्कार केला.
दोन दिवसात एकूण 13 जणांनी तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली.
तसेच मुलीचा मुंबईतील मित्र आणि दोन लॉज मालक यांनाही पोलिसांनी अटक केली.

संबंधित मुलगी पुण्याहून दादर रेल्वे स्टेशन (Pune to Dadar Railway Station) येथे जाउन प्लॅटफॉर्मवर तिच्या मित्राची वाट पाहत बसली होती. त्यावेळी कुंभार याने तीला वेफर्स, ज्युस आणि पाण्याची बाटली घेवून दिली. तसेच तिला गोड बोलून तीला मदत करण्याच्या बहाण्याने ठाणे येथील घरी घेवून गेला.  त्यानंतर त्याने तीच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.

आरोपी हा पिडितेस मुंबई (Mumbai), ठाणे येथे कोठे घेवून गेला. त्याला कोणी मदत केली आहे का?
त्याचा मोबाईल जप्त करणे तसेच पुरावे गोळा करण्यासाठी त्याला 10 दिवसाची पोलिस कोठडी द्यावी,
अशी मागणी सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी केली.

हे देखील वाचा

Pune News | पुणेरी निषेध ! चुक नसताना गाडी उचलल्याने पठ्ठ्यानं निषेध म्हणून गाडीचं ‘स्मारक’ उभारलं

Time Magazine Top 100 influential list | टाइम मॅगझीन लिस्ट ! जगातील 100 प्रभावशाली लोकांमध्ये PM मोदी, CM ममता बॅनर्जी, ‘सीरम’चे CEO अदर पूनावाला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Gang Rape | one more criminal arrested in pune gang rape case of wanwadi police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update