पुणे : हप्ता देण्यास नकार देणाऱ्या रिक्षा चालकावर टोळक्याचा हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मांजरी रोडवर चालवणाऱ्या रिक्षा चालकांना दरमहा हप्ता देण्याची दमदाटी करणाऱ्या टोळक्याला हप्ता देण्यास नकार देणाऱ्या रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला करुन रिक्षाची तोडफोड करण्यात आली. हा प्रकार रविवारी (दि.१) सकाळी साडेआठच्या सुमारस बधेवस्ती रिक्षा स्टँड मुंढवा येथे घडला. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार भापकर, बिट्ट्या उर्फ स्वप्निल कुचेकर, आदेश कुमावत, संग्राम नाईक आणि त्यांचे इतर दोन साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय अर्जुन भोकरे (वय-२४ रा. मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d3c89a93-7f84-11e8-b912-0f46b6510aa8′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोकरे हे मांजरी रोडला रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टोळके रिक्षा स्टँडवर आले. या टोळक्याने रिक्षा चालकांना रिक्षा चालवायची असेल तर दरमहा दोनशे रुपये हप्त्याची मागणी केली. त्यावेळी उदय भोकरे यांनी हप्ता देण्यास नकार दिला. हप्ता देण्यास नकार दिल्याने टोळक्याने भोकरे यांच्या गळ्याला कोयता लावून हात पाय तोडण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करुन मारहाण करत रिक्षाची तोडफोड करुन नुकसान केले. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अमोल गवळी करीत आहेत.