Pune Gangster Sharad Mohol’s Wife Joins BJP | कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळच्या पत्नीचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Gangster Sharad Mohol’s Wife Joins BJP | पुण्यातील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी भाजपमध्ये प्रवेश (Pune Gangster Sharad Mohol’s Wife Joins BJP) केला. यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Murlidhar Mohol), भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City President Jagdish Mulik) उपस्थित होते.
शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुण्यासह पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि पुणे ग्रामीण (Pune Rural) भागात अनेक गंभीर गुन्हे (FIR) दाखल आहेत. पुणे पोलिसांनी (Pune Police) शरद मोहोळविरोधात मोक्का कारवाई (MCOCA) Mokka केली होती. शरद मोहोळ येरवडा कारागृहात (Yerawada Jail) असताना त्याने दहशतवादी कातील सिद्दीकी याचा खून (Terrorist Katil Siddiqui Murder) केला होता. अशा कुख्यात गुंडाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Gangster Sharad Mohol’s wife joins BJP)
यापूर्वीच प्रवेश होणार होता
दोन वर्षापूर्वी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात स्वाती मोहोळ यांनी हजेरी लावली होती.
त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचे पुण्यात प्रकाशन झाले होते.
त्यावेळी शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहळ यांनी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला होते.
यावेळी हजारो कार्यकर्त्यांना शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आणले होते. मात्र त्यावेळी स्वाती मोहोळ यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Web Title :- Pune Gangster Sharad Mohol’s Wife Joins BJP | gangster sharad mohols wife joins bjp in the presence of chandrakant patal
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Mahavitaran News | महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन