पुण्यात साकारण्यात आला ‘370 कलमा’वर आधारित ‘देखावा’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात गणपतीनिमित्त अनेक देखावे साकारले जात आहेत. यंदा हलत्या देखाव्यांबरोबरच, काहीतरी संदेश देणारे देखावा साकारण्यावर मंडळांचा भर दिसत आहे. त्यात घरचे देखावाही मागे नाहीत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर त्यावर आधारित देखावा शनिवार पेठेतील संजय तांबोळी यांनी साकारला आहे. त्या देखाव्याला ‘कलम 370 हटवल्यानंतरचा भारत’ असे नाव देण्यात आले आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

संजय तांबोळीना याबद्दल माहिती देताना सांगितले की, आम्ही दरवर्षी चालू घडामोडींवर आधारित देखावा करतो. यंदा जम्मू काश्मीरमधील 370 हे कलम हटवल्याने आम्ही त्यावर आधारित देखावा साकारला. या निर्णयाचे देशभरात स्वागत होत आहे.

या देखाव्यात दाखवण्यात आले आहे की, जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांना लाल चौकात ध्वज फडकत होता आता तिरंगा फडकत आहे. मोठ मोठ्या इमारती उभारल्या आहेत. लोक नोकरीसाठी कंपन्यामध्ये जात आहेत. हा देखावा पाहण्यासाठी लोक त्यांच्या घरी भेट देत आहेत. ते म्हणाले की मी हा देखावा साकारला आहेच परंतू आता पुण्यात राहणाऱ्या जम्मू काश्मीरच्या तरुणांच्या हस्ते गणपतीची आरती देखील करणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –