Pune Ganpati Festival 2021 | पुण्यात जमावबंदी किंवा कोणतेही नवे निर्बंध लागू केले नाहीत – डॉ. रवींद्र शिसवे (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुणे शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात (Pune Ganpati Festival 2021) साजरा केला जातो. मात्र मागील वर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर (Pune Ganpati Festival 2021) कोरोनाचे संकट आहे. पण पुण्यात कोणतेही नवे निर्बंध लागू केले नसल्याचं पोलीस सह आयुक्त शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve) यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेशोत्सवादरम्यान जमावबंदीचे (Curfew) आदेश लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती सध्या प्रसारित केली जात आहे.
मात्र पुण्यात असे कोणतेही नवे निर्बंध (New restrictions) लागू केले नसल्याचे पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
मात्र यामध्ये काहीही तथ्य नसल्याने प्रत्यक्ष पुणेकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

7000 पोलिसांचा बंदोबस्त

शहर पोलिसांनी (City Police) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आचारसंहिता (Code of Conduct) तयार केली आहे.
बंदोबस्तावरील पोलिसांकडून या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
उत्सवासाठी नागरिक बाहेर पडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
त्यामुळे यांदा श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत.
गणेश उत्सवासाठी यंदा 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याशिवाय 700 अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक,
होमगार्ड, फिरते नियंत्रण कक्ष, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश राहणार आहे.

 

गुन्हे शाखेचा वेगळा बंदोबस्त

शहरात गणेश उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुन्हे शाखेचा (crime branch) वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रत्येक झोननुसार गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकामध्ये 100 कर्मचारी असणार आहेत. याशिवाय घातपात विरोधी कारवाईसाठी विशेष शाखेचा देखील बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.
तसेच वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) देखील बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर

पोलिसांकडून बंदोबस्ताच्या ठिकाणी मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणावर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
गर्दीची ठिकाणे, महत्त्वाची मंडळांची मंदिरे व मंडपात कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
याचे चित्रिकरण थेट पोलीस ठाण्यात दिसणार आहे, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे.
उत्सव काळातील चित्रिकरण संग्रहीत ठेवण्यात येणार आहे.

 

Web Title : Pune Ganpati Festival 2021 | joint commissioner police clarified no curfew has been imposed pune or any new restrictions

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Police Transfer | राज्य पोलिस दलातील 37 IPS, 54 उपायुक्त अन् 92 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या, जाणून घ्या एका क्लिकवर

Pune Rural Police | पुणे ग्रामीणच्या अप्पर पोलिस अधीक्षक पदी मितेश घट्टे

Maharashtra Police Transfer | राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल ! 37 IPS अधिकार्‍यासह 92 उप अधीक्षक / सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या