Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023 | युरोपियन तरुणीला मर्दानी खेळाची भुरळ, विसर्जन मिरवणुकीत प्रात्यक्षिक सादर करुन जिंकली पुणेकरांची मने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023 | पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हटलं जातं. पुण्यात अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात. हे अभ्यासक्रम शिकण्यासाठी जगभरातून विद्यार्थी पुण्यात येत असतात. मात्र एका युरोपीयन (European) मुलीने खास मर्दानी खेळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे गाठलं. पुण्यात येऊन तिने मर्दानी खेळ शिकून घेतले. एवढेच नाही तर तर गणपती विसर्जन मिरवणुकीत (Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023) तिने मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून पुणेकरांची मने जिंकली आहेत. अॅना मारा असे या तरुणीचे नाव असून ती ईटली येथील आहे.

अ‍ॅना मारा म्हणाली, श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्यामधील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला होता. त्यानंतर प्रशिक्षक यांच्याशी संपर्क साधला आणि मी पुण्यात आले. पुण्यात येऊन मी मर्दानी खेळाचे प्रशिक्षण घेतले आणि त्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. याशिवाय मी भारतीय संस्कृती बद्दल आजवर ऐकले होते. आज प्रत्यक्षात त्या वातावरणाचा अनुभव मी घेतला असून मी खूप आनंदी आहे. मी पुढील वर्षी देखील मिरवणुकीत सहभागी होणार आहे, असे अॅना मारा हिने सांगितले.

महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असलेली शिवकालीन मर्दानी युद्ध कला याची आवड निर्माण झाल्याने त्या कलेचे
प्रशिक्षण घेण्यासाठी अ‍ॅना मारा ही तरुणी इटली येथून पुण्याच्या आखाड्यात प्रशिक्षण घेण्यासाठी आली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सहासी खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी ती थेट पुण्यात आल्याने तिचा सर्वांना अभिमान वाटत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Heart Health : हृदयाची घ्यायची असेल चांगली काळजी, तर आजच ताटात या सुपर फूड्सचा करा समावेश, नेहमी राहाल निरोगी

Capsicum Side Effects | Capsaicin युक्त शिमला मिरची जरा सांभाळून खा, जास्त खाल्लास आरोग्याचे होईल असे नुकसान

Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023 | पुण्यातील विसर्जन मिरवणुक मार्गावर साकारली सायबर क्राईमवर आधारित रांगोळी