
Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023 | पुण्यातील विसर्जन मिरवणुक मार्गावर साकारली सायबर क्राईमवर आधारित रांगोळी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यामध्ये गणेशोत्सवासोबतच (Pune Ganeshotsav 2023) गणपती विसर्जन मिरवणुकीला (Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023) विशेष महत्व आहे. ही मिरवणुक पाहण्यासाठी देशभरातून गणेशभक्त पुण्यात आले आहेत. लक्ष्मी रस्ता गणेशभक्तांनी फुलून गेला आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये (Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023) शहरातील अनेक संस्था संघटना मिरवणुक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सेवा देण्याचे काम करीत असतात. त्यापैकी एक असलेल्या राष्ट्रीय कला अकादमी ही संस्था 25 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या संस्थेकडून आजवर मंडई चौक ते अलका टॉकीज चौकादरम्यान येणाऱ्या 11 चौकांमध्ये सामाजिक विषयांवर रांगोळ्या साकारुन नागरिकांचे प्रबोधन करण्याचे काम केले आहे. यंदाच्या वर्षी संस्थेने देखील ही परंपरा कायम ठेवली आहे. संस्थेने सायबर क्राईमवर (Cyber Crime) आधारित भव्य अशा रांगोळ्या साकारल्या आहेत. या रांगोळ्या पाहण्यासाठी आणि फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय कला अकादमीचे संचालक मंदार रांजेकर (Mandar Ranjekar) यांनी सांगितले की, यंदा 25 व्या वर्षांत राष्ट्रीय कला अकादमी संस्था पदार्पण करीत आहे. या संपूर्ण काळात प्रत्येक वर्षी सामाजिक विषयावर रांगोळ्या साकारुन पुणेकरांचे प्रबोधन करण्याचे काम केले आहे. या उपक्रमाला नागरिकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. याबद्दल आम्ही पुणेकर नागरिकांचे आभारी आहोत. (Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023)
आपण सर्वजण सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. त्यादरम्यान अनेकांची फसवणूक (Cheating Case)
झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा विचार करुन पुढील काळात आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची फसवणूक
होऊ नये यासाठी यंदा आम्ही सायबर क्राईमवर आधारित विसर्जन मिरवणुक मार्गावर येणाऱ्या 11 चौकामध्ये
रांगोळी साकारली असल्याचे मंदार रांजेकर यांनी सांगितले.
गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी जवळपास दोन महिने रांगोळी साकारण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
यामध्ये यंदा 350 कलाकारांनी सहभाग घेतला आहे. 1250 किलो रांगोळी, 750 विविध रंग आणि 700 किलोचा
गुलाल यंदाच्या रांगोळीमध्ये वापरण्यात आल्याचे रांजेकर यांनी सांगितले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा