पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गणपती बप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… गणपती चालले गावाला… चैन पडेना आम्हाला असा जयघोष करत पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. मागील दहा दिवस बप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर आज आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात येत आहे. पुण्यातील मानाचे पाचही गणपती विसर्जन मार्गावरुन विसर्जन स्थळाकडे मार्गस्थ झाले. पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन दुपारी सव्वाचारच्या सुमारास झाले. तर साडेपाच वाजता मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन झाले. पावणे सहाच्या सुमारास मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालिम मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले. पावणे सातच्या सुमारास पुण्याचा मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले. सव्वासातच्या सुमारास मानचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20c2d4aa-befe-11e8-be47-b7cb16c256d5′]

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनासाठी भव्य रथ तयार करण्यात आला आहे. विवेक खटावकर यांनी साकारलेल्या ‘श्री विश्वविनायक’ रथातून दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघणार आहे. अतिशय मनमोहक नक्षींनी हा रथ सजवण्यात आला आहे. मोती रंगाच्या २७ हजार दिव्यांनी उजळलेला हा रथ डोळे दिपावणारा आहे. त्यावर रंगीबेरंगी कोरीवकाम केलेले ५ कळस बसविण्यात आले आहेत. तसेच, २२५ आकर्षक झुंबर रथावर लावण्यात आले आहेत.

डीजे तर वाजणारच !

पुण्यातील मानाचे पाच गणपती

पुण्यातल्या गणेशोत्सवाच्या आकर्षणाचं केंद्र म्हणजे मानाचे पाच गणपती. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या पाचही मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी आणि आता विसर्जनसाठीही राज्यभरातून गणेशभक्त पुण्यात येतात.

प्रमुख विसर्जन घाट
संगम घाट, वृद्धेश्‍वर घाट, अष्टभुजा मंदिर नारायण पेठ, बापू घाट नारायण पेठ, विठ्ठल मंदिर अलका चौक, ठोसरपागा घाट, राजाराम पूल घाट, चिमा उद्यान येरवडा, वारजे कर्वेनगर, आपटे घाट, ओंकारेश्‍वर, पुलाची वाडी, गरवारे महाविद्यालयाची मागील बाजू, दत्तवाडी घाट, औंधगाव घाट, बंडगार्डन घाट.

विसर्जन व्यवस्था ठिकाणे  
विसर्जन घाट २२, नदीपात्र २२, लोखंडी टाक्या ८२, बांधीव हौद ४६, विहिरी ७ कॅनॉल २८, पोलिस कर्मचारी, ७ हजारांवर वाहतूक कर्मचारी ६००, मुख्य विसर्जन मार्गावरील मंडळे ६५, एकूण मंडळे ४ हजार ५००

Live Update

पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे मिरवणू, दगडु शेठ गणपतीच्या मिरवणूकीची उत्सुकता

पुण्यातील मानचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे विसर्जन

पुण्याचा मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे विसर्जन.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती अलका चौकात

पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालिम मंडळाच्या गणपतीचे विसर्जन

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती अलका चौकात, गजलक्ष्मी ढोलपथकाचे बहारदार वादन.

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे सायंकाळी ५ वाजता विसर्जन

पुण्याचे ग्रामदैवत मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे हौदात विसर्जन

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता पुण्यात डिजेचा ‘दणदणाट’

बेलबाग चौकात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी; विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनची नजर

मानाचा पहिला कसबा गणपती विजय टाॅकिज चौकात दाखल

कसबा गणपती विजय टाॅकिज चौकाजवळ…

उन्‍हाचा तडाखा तरीही गणपती विसर्जन मिरवणून पाहण्‍यासाठी लोकांची गर्दी

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती समोरील पथके बेलबाग चौकात दाखल

कसबा गणपतीसमोर परदेशी नागरिक मिरवणुकीत सहभागी

मानाचा पहिला गणपती कसबा गणपती ची मिरवणूक अलका टॉकीज चौकात दाखल

पुण्यामध्ये पोलिसांनी डॉल्बीविरोधात धडक कारवाई करताना डहाणुकर कॉलनी जवळ एका मंडळाचा मिक्सर जप्त केला

काही वेळात मानाचा पहिला गणपती अलका टॉकीज चौकात पोहचेल

बेलबाग चौकात महिलांचे पारंपारीक वेषात ढोलवादन, महिलांचे लेझीम पथक

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम टिळक पुतळ्यापासून बेलबाग चौकाच्या दिशेने

मानाचा पहिला कसबा गणपती लक्ष्मी रोडवर मार्गस्थ, तर दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती बेलबाग चौकात

पुण्यातील रस्त्यांवर भव्य आणि आकर्षक रांगोळ्या, महानगरपालिकेकडून 210 ठिकाणी विसर्जनाची सोय

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती शेषनाग रथात विराजमान झाला आहे.

तुळशीबाग गणपती मंडळापुढे सादर करण्यात येत असलेला मर्दानी खेळ