Pune : ‘गे’डेटिंग अँपवर झाली ओळख, तरुणाला भेटण्यास बोलावून काढले नग्न फोटो, पुढं झालं असं काही…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – 68 वर्षीय जेष्ठाला डेटिंग(gay dating app)साठी तरुणी पुरवतो म्हणून पैसे उकळल्याचा प्रकार ताजा असताना “गे”डेटिंग अँप(gay dating app)वर ओळख झाल्यानंतर त्या तरुणाला भेटण्यास बोलावून त्याचे नग्न फोटो काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्याने फोटो काढण्यास नकार दिल्याने त्याला तिघांनी धमकावत फोन पेद्वारे 10 हजार ट्रान्सफरकरून फसवणूक केली आहे. कोंढव्यात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 35 वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वानवडी भागात राहण्यास आहेत. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. दरम्यान त्यांची यातील एका आरोपीसोबत “ब्ल्यूड गे डेटिंग अँप”वर ओळख झाली होती. त्यांचे चॅटिंग सुरू झाले. यावेळी दोघांनी सहमतीने भेटायचे ठरवले. यानंतर ते कोंढवा बुद्रुक परिसरात भेटले. पण यावेळी आरोपींने त्यांचे नग्न फोटो काढण्यास सुरुवात केली.

यावेळी फिर्यादी यांनी त्याला विरोध केला. विरोध करताच आरोपीने आणखी दोघांना बोलावले. तसेच तिघांनी मारहाण करत घातक हत्याराचा धाक दाखवला व धमकावण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या फोन पेद्वारे जबरदस्तीने 10 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर आरोपी पसार झाले. हा सर्व प्रकार 12 ऑक्टोबरला घडला आहे. यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.