संतापजनक ! डबा खात बाकावर बसलेल्या ‘तरुणीला’ पुणेकराची काठीने मारहाण, कर्वेनगर मधील पश्चिमानगरीतील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तिथे काय उणे’ ही उक्ती कित्येकदा पुणेकरांना नेमकेपणाने लागू होते. पुन्हा एकदा या उक्तीचा प्रत्यय पुण्यात आला आहे. एका ज्येष्ठ नागिराकाने डबा खात बाकावर बसलेल्या तरुणीला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना कर्वेनगर येथे घडली. डबा खात बसलेल्या तरुण-तरुणीला एका वृद्ध इसमाने त्यांना हटकले. त्याने बाकावर बसून डबा खाऊ नका असे सांगितल्याने त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. संतापलेल्या ज्येष्ठ नागरिकाने तरुणाला काठीने मारहाण करण्यास सुरुवता केली. त्यावेळी तरुणीमध्ये पडली असता तिला देखील काठीने मारहाण केली. या घटनंतर तरुणीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी येई पर्य़ंत मारहाण करणारा ज्येष्ठ नागरिक तेथून फरार झाला.

संजय मोहेकर (वय-६२ रा. १० सी, कर्वेनगर) असे मारहाण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. कर्वेनगर येथील पश्चिमानगरी सोसायटीमध्ये १० सी इमारतीजवळ असणाऱ्या बाकावर तरुण-तरुणी डबा खात बसले होते. त्यावेळी संजय मोहेकर त्या ठिकाणी आले. त्यांनी या ठिकाणी डबा खाऊ नका अशी तंबी दोघांना दिली. त्यावेळी तरुणाने काका मी आजारी आहे. डॉक्टरांकडे आलो आहे. डबा खाऊन झाल्यावर निघून जातो  असे सांगितले. मात्र मोहेकर यांनी या तरुणाचे काहीह ऐकून न घेता त्याच्यासोबत शाब्दीक वाद घालण्यास सुरुवात केली. तरुणाने त्यांना समजाऊन सांगीतले. मी देखील याच ठिकाणी राहतो, डबा खाऊन झाल्यावर निघून जातो असे सांगितले. मात्र त्याचे ऐकून न घेता हातातील काठीने मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी तरुणी मध्ये पडली असता तिला देखील काठीने मारहाण केली. दोघांना मारहाण करून आरोपी इसम पश्चिमानगरी सोसायटीमधील ‘१० सी’ इमारतीमध्ये स्वतःच्या फ्लॅट नंबर ३ मध्ये निघून गेला.

तरुणीने पोलीस नियंत्रण कक्षाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावेळी पेट्रोलिंगवर असलेले दोन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात चौकशी करून सजंय मोहेकर यांच्या घरी गेले असता घराला कुलुप लावून तो फरार झाला. यानंतर तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी घटनेची साक्ष दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पी.व्ही. जाधव करीत आहेत.