गणिताचा पेपर अवघड गेल्यानं 10 वी च्या विद्यार्थीनीची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शर्वरी जगताप (वय-१६) या दहावीतील मुलीने गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून, राहत्या घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. गुरुवारी गणिताचा पेपर होता.

शर्वरीला गणिताचा पेपर अवघड गेल्यामुळे ती प्रचंड दबावाखाली होती, तिने आपल्या बहिणीस याबाबत सांगितले व मला आत्महत्या करावीशी वाटत आहे असे शर्वरी आपल्या बहिणीस म्हणाली. बहिणीने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि शर्वरीशी तिच्या आईचे बोलणे करून दिले. आईने आपण घरी लवकर येणार असल्याचे सांगत तिची समजूत काढली.

शर्वरी व तिची बहीण शेजाऱ्यांच्या घरी बसली असताना, शर्वरी आपल्या घरी जाऊन येते असे सांगून गेली आणि ओढणीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी दिली.