तीनं हॉस्टेलला राहण्यासाठी 3 वेळा उचललं ‘हे’ पाऊल ! ‘ब्लेम’ आई-वडिलांवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अकरावीत शिक्षण घेणार्‍या एका 16 वर्षीय मुलीनं चक्क हॉस्टेलला राहता यावे यासाठी हातावर ब्लेड मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, पुणे पोलिसांच्या दामिनी पथकानं तिला वाचविले आहे. यापुर्वीही तिने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. धक्कादायक म्हणजे, तीने आत्महत्येचे कारण आई-वडिल अन् नातेवाईक असल्याचे सांगितले. पोलिसांनी सत्यता पडताळल्यानंतर मात्र, तिला हॉस्टेलला राहायचे होते, पण त्याला कुटूंबियाचा याला विरोध असल्याचे समजले.

या घटनेची नोंद दत्तवाडी पोलीस ठाण्यात स्टेशन डायरीत करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे आई-वडिल वेगवेगळे राहतात. मुलगी येथील एका हायस्कूलमध्ये अकरावीच्या वर्गात शिक्षण घेते. दरम्यान, हायस्कूलमध्ये परिक्षा होती. परिक्षेत तिला मोबाईलमध्ये कॉपी करताना पकडले होते. यावेळी प्राध्यापकांनी तिला समजावून सांगितले. काही वेळानंतर ती अचानकच बेंचवर डोके आपटून घेऊ लागली. तसेच, गोंधळ घालत मला जगायच नाही, असे म्हणू लागली. तिला प्राध्यापक व इतर शिक्षकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती कोणाचेच ऐकत नव्हती. त्यानंतर तिने अचानक बॅगेतून ब्लेड काढली आणि हातावर ब्लेड मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागली. यामुळे तिला पकडून शाळेने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर दामिनी पथकातील एस. डी. डुकरे आणि एस. एल. कदम यांनी तत्काळ शाळेत धाव घेतली. तसेच, मुलीला ताब्यात घेऊन दामिनी पथकाने तिला विश्वासात घेऊन चौकशी केली.

त्यावेळी मुलीने मला आई-वडिल व नातेवाईक त्रास देतात. लग्न कर म्हणून मागे लागले आहेत. त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. यानंतर तिच्या आई-वडिल व मावशीला बोलावून घेतले.
आई व मावशी आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी असे काही नाही. ती मावशीकडे राहते. तिला तिथेही राहयचे नाही. आता ती हॉस्टेलमध्ये राहायचे म्हणून हट्ट धरून बसली आहे, अशी माहिती मिळाली. परत मुलीकडे चौकशी केल्यानंतर तिने मला एकटीला राहायचे आहे. यापुर्वीही तिने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून हॉस्टेलमध्ये राहण्याला विरोध असल्याचे आईने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिला विचारपूस केली. त्यावेळी तिने मला मावशीकडे राहायचे नसून, एकटीला राहायचे असे सांगितले. त्यानंतर पोलीस कर्मचारी डुकरे व कदम यांनी तिची समजूत काढली. तिचे मन परिवर्तन केले आणि कुटूंबियासोबत पाठविले.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like