‘पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला अवाजवी प्रसिद्धी नको’ – HC

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे येथील एका २२ वर्षांच्या तरूणीची कथित आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. जरा जरी या प्रकरणात नवी काही माहिती हत्ती लागली कि त्याची प्रसिद्धी केली जाते. त्यामुळे संबंधित तरुणीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने तरूणीची कथित आत्महत्या आणि तिचे एका राजकीय नेत्याशी असलेल्या कथित संबंधांच्या प्रकरणाला अवाजवी प्रसिद्ध देऊ नका, अशी सूचना केली आहे.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर हि सुनावणी झाली त्यावेळी प्रसारमाध्यमांना या प्रकरणाला अवाजवी प्रसिद्ध न देण्याची सूचना केली. तसेच सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात माध्यमप्रणित सुनावणीबाबत निकाल देताना उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करावे असेही न्यायालयाने म्हटले आहे.