पुण्यात 22 वर्षीय तरूणीची गळफास घेवुन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील सिहगड रोड परिसरात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दुपारी ही घटना घडली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोमल महादेव बांदल (वय २२, रा.पोकळे वस्ती, धायरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सिहंगड रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमलचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तिचे वडील व भाऊ खासगी कंपनीत नोकरीस आहेत. आज सकाळी भाऊ व वडील कामाला गेले होते. तर तिची आई सकाळी अकराच्या सुमारास दवाखान्यात गेली होती. त्यावेळी कोमल एकटी घरी होती. दुपारी दीडच्या सुमारास कोमलची आई घरी परत आली. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा वाजवला. परंतु, कोमलने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर शेजारच्या गॅलरीमधून एकाला आत उतरवून आतील कडी काढली. त्यावेळी कोमलने आत्महत्या केली असल्याचे आढळुन आले. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास सिहंगड रोड पोलीस करत आहेत.