पुण्याच्या ‘पोरी’ अतिहुशार ; जॅमर काढण्यासाठी ‘हे’ केलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र पोलिसांनी कितीही कडक कायदे केले किंवा दंड केला तरी पुणेकरांवर काहीही परिणाम होताना दिसत नाही. असाच एक प्रकार समोर आला असून पुण्यातील पोरी किती हुशार असतात याचा अनुभव वाहतूक पोलिसांना नक्कीच आला असणार.

नो-पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकीला पोलिसांनी जॅमर लावला आणि ते त्यांच्या दुसऱ्या कामात व्यस्त झाले. याचाच फायदा घेऊन दुचाकी चालवणाऱ्या मुलींनी गाडीच्या चाकाची हवा सोडून जॅमर काढून तेथून निघून गेल्या.

मुलींनी टायरमधील हवा चावीने सोडून जॅमर काढले. मात्र, असे करणे या दोन मुलींना चांगलेच महागात पडले. वाहतूक पोलिसांनी दामिनी पथकाशी संपर्क करून मुलींची माहिती पथकाला दिली. डेक्कन येथे असणाऱ्या दामिनी पथकाने परिसरात मुलींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. मुलींना गाडीत हवा भरत असताना दामिनी पथकाने पकडले.

मुलींनी गाडीला लावलेला जॅमर शिताफीने काढण्याचा प्रयत्न केला मात्र या मुलींना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. पोलिसांनी त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना समज देऊन सोडून दिले. मुलींनी पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांनी आपणही काही कमी नसल्याचे दाखवून दिले. हा सर्व प्रकार जंगली महाराज रोडवर घडला.

आरोग्य विषयक वृत्त 

श्वास घेताना आपण करतो ‘या’ सामान्य चुका,आयुष्यमान होते कमी

जेवल्यानंतर तात्काळ करु नका ‘ही’ कामे

भाज्या बॉइल करुन खाण्याचे आहेत अनेक फायदे