Pune : कुष्ठरुग्णांना कोविड लस द्या अन्यथा आंदोलन करू- शेतकरी नागरिक संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष दीपक चौगुले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिसोळी (अंतुलेनगर, ता. हवेली, जि. पुणे) येथे मागिल ३० वर्षांपासून दोन हजार कुष्टरुग्ण बांधवांना तातडीने कोविड-१९ लस द्यावी. त्यांना कोविड लस मिळाली नाही. कुष्ठरुग्णांना लवकरात लवकर लस दिली नाही, तर शेतकरी नागरिक संघाच्या वतीने कुष्ठरुग्णांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकाना दिलेल्या निवेदनाद्वारे शेतकरी नागरिक संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष दीपक चौघुले यांनी केली आहे.

मोरे म्हणाले की, अंतुलेनगर येथे दोन हजार कुष्ठरुग्ण राहत आहेत, त्यातील अनेकजण अपंग असल्याने त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यास अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने त्यांच्या निवासाच्या ठिकाणी लसीकरण करावे, असा अध्यादेश काढला आहे. मात्र, अद्याप त्यांना लस मिळाली नाही. कुष्ठरुग्णांना कोव्हीड 19 चे लसीकरण झाले नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने कुष्ठरुग्णांना लस द्यावी, असे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.