पतीसोबत दुचाकीवर जाणार्‍या महिलेचे गंठण हिसकावले

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पतीसोबत दुचाकीवर जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकविल्याची घटना कोंढव्यातील इनामदार हॉस्पीटलजवळ शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात 57 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या शनिवारी रात्री पतीसोबत दुचारीवरून जात होत्या. इनामदार हॉस्पिटलजवळ गेल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी तक्रारदार यांच्या गळ्यातील एक लाख रूपये किंमतीचे गंठण हिसका मारून चोरून नेले. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like