Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पुण्यातील आजचा दर काय? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) बदल होताना दिसत आहे. सोन्याला केवळ त्याच्या शोभेच्या मूल्यासाठीच प्राधान्य दिले जात नाही तर गुंतवणुकीचे सुरक्षित साधन म्हणूनही पाहिले जाते. तथापि, देशांतर्गत, तसेच, आंतरराष्ट्रीय घटकांवर अवलंबून किंमतींमध्ये नियमितपणे चढ-उतार होत राहतात. महाराष्ट्रामध्ये (Pune Gold Rate Today) आज (दि.14 जून) रोजी सोन्याचा दर 24 कॅरेटसाठी 59,310 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 54,368 रुपये आहे.

 

पुण्यामध्ये आज सोन्याचा दर (Pune Gold Rate Today) 24 कॅरेटसाठी 59,310 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 54,368 रुपये आहे. मंगळवारी (प्रति 10 ग्रॅम) सोन्याचा भाव 59,600 (24 कॅरेट) रूपये होता. आज चांदीची किमत (प्रति किलो) 72,520 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 73,120 रुपये प्रतिकिलो होती. हे पाहता आज पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसत आहे.

 

आजचा सोन्याचा भाव किती? (Gold-Silver Price on 14 June 2023)

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,368 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,310 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,368 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,310 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,368 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,310 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,368 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,310 रुपये

 

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care App) या अ‍ॅपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

 

Web Title :  Pune Gold Rate Today | gold silver prices on thursday maharashtra 14 june 2023 mumbai pune nagpur nashik new price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा