पादचारी जेष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकाविली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – इमारतीनजीक रस्त्यावर फिरत असताना पाठीमागून आलेल्या चोरट्याने जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. ही घटना काल संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीतील यश लॉन्स परिसरात घडली.

याप्रकरणी ७१ वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेष्ठ महिला गृहिणी असून यश लॉन्स परिसरातील इमारतीमध्ये राहायला आहे.

काल संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या घराजवळ फिरत होत्या. त्यावेळी पाठीमागून चालत आलेल्या चोरट्यांने त्यांच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यश बराटे अधिक तपास करीत आहेत.